Join us  

राज्यात २४ तासांत ५५ हजार ४११ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शनिवारी ५५ हजार ४११ रुग्ण आणि ३०९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शनिवारी ५५ हजार ४११ रुग्ण आणि ३०९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३ लाख ४३ हजार ९५१ झाली असून मृतांचा आकडा ५७ हजार ६३८ झाला आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाख ३६ हजार ६८२ आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात दिवसभरात ५३ हजार ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून एकूण २७ लाख ४८ हजार १५३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.१८ टक्के झाले असून मृत्युदर १.७२ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी १८ लाख ५१ हजार २३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३० लाख ४१ हजार ८० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून २५ हजार २९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दिवसभरात नोंद झालेल्या ३०९ मृत्यूंपैकी १७६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ७३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ६० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ३०९ मृत्यूंमध्ये मुंबई २८, ठाणे २, ठाणे मनपा १६, नवी मुंबई मनपा ३, कल्याण डोंबिवली मनपा ८, उल्हासनगर मनपा १, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा १, वसई विरार मनपा २८, नाशिक ८, नाशिक मनपा १६, मालेगाव मनपा १, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा २, जळगाव ५, नंदुरबार १, पुणे ४, पुणे मनपा ९, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर ३, सोलापूर मनपा ५, सातारा ३, कोल्हापूर मनपा १, सांगली मिरज कुपवाड मनपा ६, रत्नागिरी ३, जालना ७, हिंगोली १, परभणी ४, परभणी मनपा २, लातूर ५, लातूर मनपा २, उस्मानाबाद ६, बीड ५, नांदेड १४, नांदेड मनपा १४, अकोला मनपा ६, अमरावती ३, अमरावती मनपा ३, बुलडाणा ३, वाशिम ३, नागपूर २१, नागपूर मनपा २२, वर्धा २, भंडारा २, गोंदिया ७, चंद्रपूर २, चंद्रपूर मनपा ३, गडचिरोली ८ इ. रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हासक्रिय रुग्ण

पुणे१,०२११५

मुंबई ८९७०७

ठाणे ७१०६१

नागपूर ५६६९८

नाशिक ३२८११