Join us  

महापालिकेच्या ५०४ बालवाड्या कागदावरच, शिक्षण समिती सदस्यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:17 AM

महापालिका शाळांमध्ये ५०४ नवीन बालवाड्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र अद्याप यापैकी अनेक बालवाड्या केवळ कागदावरच आहेत तर काही बालवाड्यांमध्ये विद्यार्थीच नसल्याचे समोर येत आहे.

मुंबई : महापालिका शाळांमध्ये ५०४ नवीन बालवाड्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र अद्याप यापैकी अनेक बालवाड्या केवळ कागदावरच आहेत तर काही बालवाड्यांमध्ये विद्यार्थीच नसल्याचे समोर येत आहे. तरीही आणखी काही बालवाड्या नव्याने सुरू करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे. याचे तीव्र पडसाद शिक्षण समितीच्या बैठकीत उमटल्यानंतर या बालवाड्यांचे तपशील देण्याचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत.सन २००८पासून पालिका शाळांमध्ये संस्थेमार्फत ५०४ बालवाड्या चालविण्यात येतात. मात्र त्यामधील शंभर बालवाड्या चालविण्यास त्या संस्थांनी असमर्थता दर्शविली होती. या शंभर बालवाड्या तसेच २९६ अशा एकूण ३९६ बालवाड्या वाढविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला होता. त्यावर प्रशासनाला स्थायी समितीच्या सदस्यांनी फैलावर घेतले.शिक्षकांना आणि मदतनिसांना देण्यात येणारे मानधन अत्यल्प आहे. या संस्थांमार्फत ५०४ बालवाड्या चालविण्यात येत आहेत. त्याबद्दल गेल्या चार वर्षांपासून माहिती मागविण्यात येत आहे. परंतु त्या कोणत्या ठिकाणी चालविण्यात येतात याची माहिती अद्याप शिक्षण विभागाने दिलेली नाही. या बालवाड्या का चालत नाहीत? याची माहिती देण्याची मागणी सदस्यांनी केली.आपल्या पाल्याला एकदाबालवाडी वर्गात घातले की त्या शाळेतच दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करूनच त्याने बाहेर पडावे, अशी पालकांची इच्छा असते.2016मध्ये बालवाड्यांतील १३ हजार २७७पैकी पाच वर्षे पूर्ण केलेल्या ७,१०९ विद्यार्थ्यांनी पालिकाशाळेत प्रवेश घेतला होता.पालिका शाळांमध्ये संस्थातर्फे चालविण्यात येणाºया बालवाड्यांपैकी शंभर बालवाड्या चालविण्यास या संस्थांनी असमर्थता का दर्शविली, याचे स्पष्टीकरण देण्याची सूचना सदस्यांनी केली.

टॅग्स :मुंबई