Join us

सिकलसेलचे 4,909 रुग्ण

By admin | Updated: August 24, 2014 01:35 IST

लाल रक्तपेशींवर आघात करणारा सिकलसेल हा कधीही बरा न होणारा आजार आहे.

सुरेश लोखंडे - ठाणो
लाल रक्तपेशींवर आघात करणारा सिकलसेल हा कधीही बरा न होणारा आजार आहे. या आजाराने पीडित  (सफरर) असलेल्या रुग्णांसह त्याचा प्रसार (कॅरिअर) करणारे चार हजार 9क्9 रुग्ण जिल्ह्यात वावरत आहेत. कधीही ब:या न होणा:या या आजाराच्या रुग्णांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा परिषदेने आरोग्य विभागाद्वारे सिकलसेल नियंत्रण विभाग सुरू करण्यात आला आहे.
रक्तामध्ये लाल व पांढ:या या दोन प्रकारच्या पेशी असतात. यापैकी लाल रक्तपेशींमध्ये हा सिकलसेल आजार  होतो. हा आनुवंशिक आजार आहे. मातापित्याद्वारे तो अपत्यांमध्ये येतो. तो पूर्णपणो बरा करणा:या औषधांचा अद्याप शोध लागलेला नाही. पण तो नियंत्रणात ठेवणो शक्य झाले आहे. त्यासाठी या आजाराने पूर्णपणो पीडित (सफरर) असलेल्या व वाहक (कॅरिअर) असलेल्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधून या आजाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांचे ‘लग्न समुपदेशन’ करण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील नाशिक, नंदुरबार, ठाणो, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, धुळे, जळगाव, नांदेड, वाशीम, अकोला, बुलडाणा, औरंगाबाद आणि रायगड या 19 जिल्ह्यांत सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाद्वारे हा कार्यक्रम राबवला जात आहे. ठाणो जिल्ह्यात 2क्क्4 पासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाद्वारे सिकलसेलने पीडित असलेल्या 4क्1 रुग्णांचा व 45क्8 वाहक रुग्णांचा शोध घेणो शक्य झाले आहे. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. पण या रक्ताला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे या रक्तपेशींचा आकार विळ्याच्या आकारासारखा होतो. यालाच सिकलसेल आजाराचा रुग्ण म्हणून ओळखणो शक्य झाले आहे.  
या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीला सातत्याने शारीरिक वेदना होतात. त्यांचे आयुर्मान सुमारे 3क् ते 4क् वर्षे असते. या आजाराची वाहक व्यक्ती सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणो जगते. तिला या आजाराचा त्रस होत नाही. तिचे आयुर्मान चांगले आहे. पण या आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून पीडित व वाहक स्त्री व पुरुष यांचे एकमेकांशी लग्न न करण्याचे समुपदेशन आरोग्य विभागाद्वारे केले जात आहे. यामुळे पीडित व्यक्तीने निरोगी महिलेशी लग्न केलेले 83 परिवार जिल्ह्यात आहेत. वाहकाशी निरोगीने लग्न केलेले 1,466 परिवार जिल्ह्यात नांदत आहेत. 
 रक्ताच्या दोन थेंबांद्वारे सोल्युबिलिटी टेस्ट केल्यानंतर इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करण्यात येते. याद्वारे आजाराने पीडित किंवा वाहकाचा शोध घेणो शक्य झाले आहे. त्यानंतर, त्यांच्यावर उपचार केला जात आहे. 1956 मध्ये नागपूर येथील सेंट्रल मिलच्या परिसराचे सव्रेक्षण डॉ. शर्मा व डॉ. सोळंखी यांनी केले असता त्याद्वारे या आजाराचे रुग्ण आढळून आले होते. त्यावर आता संशोधन केल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवणो शक्य झाले असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी सांगितले.
 
फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घेणो, जंतुसंसर्ग व तापासाठी त्वरित उपचार करणो, न्यूूमोनियाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वयाच्या सहा वर्षार्पयत पेनिसिलीनच्या गोळ्या घेणो आवश्यक, सर्वच लहान मुलांचे लसीकरण करणो आवश्यक आहे.
 
च्अशक्तपणा, निस्तेजपणा, थकवा, दम लागणो, हातापायावर सूज येणो, कावीळ, मूत्रपिंडाची दुखापत, जखमेतून होणारा रक्तस्नव, दृष्टीवर होणारा परिणाम, मानसिक व शारीरिक त्रस, जंतुसंसर्ग आदी लक्षणो.