मुंबई : दहिसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक घारगे व पथकाने केलेल्या तपासाअंती चोरीला गेलेली ४७ वाहने शोधून हस्तगत करण्यात आली. या कामगिरीसाठी पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
........................................
पोलीस ठाण्यात साजरा केला आजोबांचा वाढदिवस
मुंबई : निर्मल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भंडारे, अधिकारी व कर्मचारी यांनी पोलीस ठाण्यातच ८२ वर्षीय आजोबांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
..........................................
भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा बळी
मुंबई : भरधाव ट्रकच्या धडकेत बुधवारी दुपारी घाटकोपर विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती मार्गावरून जात असलेल्या जावेद अजीज शेख (५८) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी शेख यांचा मुलगा कासिफ शेख (२९) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
..............................