अंत्योदय कुटुंब योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील ४७  टक्के धान्यवाटप पूर्ण, दोन किलो डाळ वाटपाला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:32 PM2020-05-12T17:32:37+5:302020-05-12T17:33:16+5:30

एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या प्रति शिधा पत्रिका दोन किलो डाळ वाटपाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

47% distribution of foodgrains in Antyodaya Kutumb Yojana and Priority Family Beneficiary Scheme completed, distribution of 2 kg dal started | अंत्योदय कुटुंब योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील ४७  टक्के धान्यवाटप पूर्ण, दोन किलो डाळ वाटपाला प्रारंभ

अंत्योदय कुटुंब योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील ४७  टक्के धान्यवाटप पूर्ण, दोन किलो डाळ वाटपाला प्रारंभ

googlenewsNext

 

मुंबई : अंत्योदय कुटुंब योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील मे महिन्यातील 47 टक्के धान्यवाटप पूर्ण झाले असून एप्रिल व मे या दोन महिन्यांच्या प्रति शिधा पत्रिका दोन किलो डाळ वाटपाला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. नियंत्रक शिधावाटप व संचालक, अन्न व नागरी पुरवठा कैलास पगारे यांनी ही माहिती दिली. 

4 मे पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय कुटुंब योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ वाटप करण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अंतर्भाव न झालेल्या केशरी शिधापत्रिका धारकांना प्रति माणसी तीन किलो गहू (आठ रुपये किलो) व दोन किलो तांदूळ  (बारा रुपये किलो)  दराने देण्यात आले. 24 एप्रिल पासून मे महिन्याचे धान्य वाटप करण्यात आले. आतापर्यंत 2420 मेट्रिक टन तांदूळ व 3337 मेट्रिक टन गहू वाटप करण्यात आले आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांपैकी 20 टक्के जणांना वितरण पूर्ण करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व केशरी शिधापत्रिका धारकांपैकी कोणीही अन्नधान्यापासून वंचुत राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आल्याची माहिती पगारे यांनी दिली. 

धान्य आणण्यासाठी शिधावाटप केंद्रावर जाताना ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंग चे पालन करावे व मास्कचा वापर करावा असे आवाहन पगारे यांनी केले आहे. धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने कोणीही दुकानांसमोर गर्दी करु नये असे ते म्हणाले. 

 

Web Title: 47% distribution of foodgrains in Antyodaya Kutumb Yojana and Priority Family Beneficiary Scheme completed, distribution of 2 kg dal started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.