Join us  

माथेरानमध्ये ४५ घोड्यांवर औषधोपचार

By admin | Published: March 17, 2017 5:00 AM

मुंबई शल्य चिकित्सक संघटनेने माथेरान पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सहकार्याने नुकतेच अश्व नसबंदी शिबिर पार पाडले. या शिबिरात तब्बल ४५ घोड्यांवर औषधोपचार करण्यात आले

मुंबई : मुंबई शल्य चिकित्सक संघटनेने माथेरान पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सहकार्याने नुकतेच अश्व नसबंदी शिबिर पार पाडले. या शिबिरात तब्बल ४५ घोड्यांवर औषधोपचार करण्यात आले. तसेच ३० घोड्यांची नसबंदीदेखील केली गेली.या शिबिरासाठी मुंबई शल्य चिकित्सक संघटनेचे २५ शल्य चिकित्सक वेगवेगळ्या भागातून सहभागी झाले होते. शिबिराचे उद्घाटन माथेरान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांच्या हस्ते व नगरसेवक प्रसाद सावंत, सोनम दाभेकर, मुंबई शल्य चिकित्सक संघटनेचे डॉ. गजेंद्र खांडेकर, जिल्हापशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश लाळगे, माथेरान पशुवैद्यकीय दवाखानाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. धर्मराज रायबोले यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी अश्व पालक संघटनेचे सचिन पाटील, नगर परिषदेचे इतर पदाधिकारी घोड्यांचे मालकही उपस्थित होते. शिबिरात ३० घोड्यांची नसबंदी करण्यात आली तसेच ४५ घोड्यांवर औषधोपचार करण्यात आले. शिबिरात ‘घोड्यांचे आरोग्य’ या विषयावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. सदर शिबिरात डॉ. गुंजाटे, डॉ. महाजन, डॉ. चांदोरे, डॉ. गाढवे, डॉ. पवार, डॉ. दवे, डॉ. वेंदे, डॉ. पाटील, डॉ. चौधरी, डॉ. शाहीर, डॉ. त्रिपाठी, डॉ. मिश्री, डॉ. अमित, डॉ. आशिष, डॉ. मधुरा, डॉ. यूनिस, डॉ. अनिल, डॉ. सेरा, डॉ. सिद्धी, डॉ. भावना, डॉ. ज्योती आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)