भंडारदऱ्याला ४० टक्के मुंबई, पुणेकरांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:02 AM2021-08-02T04:02:01+5:302021-08-02T04:02:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे मुंबई, पुण्यासह राज्य आणि देशातील पर्यटकांचा ओघ वाढत आहे. मुंबईसह पुण्यातून ...

40% Mumbai and Pune residents prefer Bhandardarya | भंडारदऱ्याला ४० टक्के मुंबई, पुणेकरांची पसंती

भंडारदऱ्याला ४० टक्के मुंबई, पुणेकरांची पसंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याकडे मुंबई, पुण्यासह राज्य आणि देशातील पर्यटकांचा ओघ वाढत आहे. मुंबईसह पुण्यातून येथे दाखल होत असलेल्या पर्यटकांचे प्रमाण ४० टक्के आहे. येथे येणारे पर्यटक कोरोनाचे नियम पाळत पर्यावरणाचा समृद्ध वारसा पुढे नेत आहेत.

अनलॉकनंतर पर्यटकांचा कल इकडे येण्याकडे वाढल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिली. कोरोनामुळे बंद असलेले अभयारण्य आता पर्यटकांसाठी खुले झाले असले तरी गर्दी नियंत्रित करण्यासाठी वीकेंडला अभयारण्यात प्रवेश बंद ठेवला जात आहे. पर्यटकांना सेवा, सुविधा देतानाच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत.

अभयारण्याकरिता अनेक योजना आखण्यात आल्या असून, योजनांच्या अंमलबजावणीसाठी अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, भंडारदरा वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल आडे, राजूर वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे, वनपाल रवींद्र सोनार, एस.पी. लांडे आणि वनरक्षक मनीषा सरोदे यांच्यासह सर्व कर्मचारी कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई (उंची १ हजार ६४६ मीटर) ते हरिश्चंद्रगडपर्यंत पसरलेला, प्रवरा आणि मुळा नद्यांचे उगमस्थान असलेला जंगलपट्टा म्हणजे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य होय.

१९९४ साली हे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. अभयारण्याचे क्षेत्रफळ २९९.०९ चौरस किमी आहे.

प्रेक्षणीय स्थळे : कळसुबाई मंदिर, पांजरे बेट, अलंग, मलंग, कुलंग गड, उंबरदारा, कोकणकडा, घाटनदेवी, सांदन दरी, रिव्हर्स वॉटर फॉल, अमृतेश्वर मंदिर, रतनकडा किल्ला, नेकलेस वॉटर फॉल, नान्ही वॉटर फॉल, निसर्ग परिचय केंद्र, भंडारदरा डॅम.

वन्यप्राणी : शेकरू, बिबट्या, तरस, कोल्हा, रानमांजर, सांबर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, उदमांजर, मुंगूस, बाहुल, वानर, माकड, ससा, लांडगा.

पक्षी : बुलबुल, कोतवाल, हळद्या, नलकंड, चंडोल, हरियाल, मोर, मोठे घुबड, वटवाघूळ, रानकोंबडी, खंड्या बगळा, बहिरी ससाणा, होला, पारवा, कोकतर, लाव्हरी, तनमोर, कवड्या, होला, कुंभार कुकडा, फेसा, साळुंखी, सुतारपक्षी, दयाळ, कोकरुस, चकोर, भोत्या, कोकिळा, सुगरण, पानकोंबडी, टिटवी, घार, बाण्या.

सरिसृप व उभयचर : साप, पाल, सरडे, सापसुरळी, घोरपड, गांडुळ, बेडूक, खेकडे.

वनस्पती : करप, आंबा, जांभुळ, उंबर, करवंद, फणस, काटेसावर, बहावा, मोह, पांढरी, गळचाई, कुडा, भुतकेस, लोद, पायर, पिपर, शेंदरी, धामण, करवंद, तोरण, आंबळ, कुसर, हिरडा, बेहडा, अर्जुन, गेळ, आवळा, कडीपत्ता, रगतरोहडा.

Web Title: 40% Mumbai and Pune residents prefer Bhandardarya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.