लोकम न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात २ हजार ७३६ रुग्ण आणि ४६ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ३६ हजार २ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार २१५ झाला आहे. सध्या ३४ हजार ८६२ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळाच्या तुलनेत मागील काही दिवसांत दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूंची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यात गुरुवारी ५ हजार ३३९ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ४८ हजार ६७४ रुग्ण काेेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७१ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४८ लाख २१ हजार ५६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७८ हजार ६७६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १ हजार ९११ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्यात दिवसभरात नोंद झालेल्या ४६ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहे. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ४६ मृत्यूंमध्ये मुंबई ५, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव मनपा १, नंदुरबार १, पुणे ५, पुणे मनपा ६, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर मनपा २, कोल्हापूर मनपा १, सांगली १, सांगली-मीरज कुपवाड मनपा १, परभणी १, उस्मानाबाद १, बीड २, अकोला मनपा १. अमरावती १, अमरावती मनपा १, यवतमाळ ६, नागपूर मनपा २, वर्धा ३ आणि अन्य राज्य/देशातील एका रुग्णाचा समावेश आहे.
.........................