Join us  

मुलुंड येथून ३१ किलो गांजा जप्त, १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:28 AM

गांजा तस्करीसाठी मुंबईत आलेल्या ओडिशातील चौकडीला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांच्याकडून ३१ किलो ५५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. महेश्वर सुशांत कुमार साहू (२२), चिन्मय विभूती सहानी उर्फ बंटी (२१), बट कृष्णादास कुमार स्वाई (२०), दिव्यज्योती हिरण्य बरिक (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौघेही ओडिशा येथील रहिवासी आहेत.

मुंबई : गांजा तस्करीसाठी मुंबईत आलेल्या ओडिशातील चौकडीला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकत त्यांच्याकडून ३१ किलो ५५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. महेश्वर सुशांत कुमार साहू (२२), चिन्मय विभूती सहानी उर्फ बंटी (२१), बट कृष्णादास कुमार स्वाई (२०), दिव्यज्योती हिरण्य बरिक (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौघेही ओडिशा येथील रहिवासी आहेत.मुलुंड पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात काही जण गांजाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कासार, बाळासाहेब घावटे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मोरे आणि तपास पथकाने रविवारी सापळा रचला.यावेळी झालेल्या कावाईत चौघांना ताब्यात घेतले. तेव्हा त्यांच्या झडतीत पोलिसांना ३१ किलो ५५० ग्रॅम गांजा आढळून आला. त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.आरोपींनी हा माल कुणाकडून व कसा आणला? ते याची कुणाकडे विक्री करणार होते? याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली.तसेच त्यांच्या अन्य साथीदारांचाही शोध पोलीस घेत आहेत. या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे. चौघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १५ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.