पीएमसी बँक घोटाळ्यात ३३ हजार पानी आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:41 AM2019-12-28T06:41:48+5:302019-12-28T06:42:07+5:30

३४0 साक्षीदारांचे जबाब : मालमत्तांचा लवकरच लिलाव

3,000 water chargesheet in PMC Bank scam | पीएमसी बँक घोटाळ्यात ३३ हजार पानी आरोपपत्र

पीएमसी बँक घोटाळ्यात ३३ हजार पानी आरोपपत्र

Next

मुंबई : पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेतील (पीएमसी)४३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने शुक्रवारी पाच जणांविरुद्ध ३३ हजार पानी आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात १२ आरोपींना अटक झाली असून, त्यांच्याविरुद्धही लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाईल.

हा घोटाळा उघडकीस येताच रिझर्व्ह बँकेने खातेदारांच्या पैसे काढण्यावर निर्बंध आणले. या काळात १२ खातेदारांचा मृत्यू झाला. या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी व्यवस्थापक जॉय थॉमस, माजी अध्यक्ष वरियम सिंग, अन्य पदाधिकाऱ्यांसह एचडीआयएलच्या प्रवर्तकांविरोधात गुन्हा नोंदवला. त्यानंतर बँकेचे भांडुप येथील मुख्यालय आणि वांद्रे येथील एचडीआयएलच्या कार्यालयात छापे टाकून कर्ज खात्याचे तपशील, नोंदी, कागदपत्रे हस्तगत केली. एचडीआयएलची ३५०० कोटींची मालमत्ताही जप्त करण्यात
आली. आरबीआयने या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी प्रशासकीय अधिकाºयाची नेमणूकही केली.
वरियमसिंग कर्तारसिंग बँकेचे अध्यक्ष वरियमसिंग कर्तारसिंग एचडीआयएलमध्ये २०१४ पर्यंत संचालक होते. २०१४ मध्ये ते पीएमसीत मोठ्या पदी आले. तांत्रिकदृष्ट्या वर्षभर ते बँक व कंपनी दोन्ही ठिकाणी होते. कंपनीत असताना बँकेकडून कर्ज मिळविणे व बँकेत आल्यावर कंपनीला कर्जमंजुरीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

जॉय थॉमस
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस १९८७ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांच्या निर्णयांमुळे बँकेच्या शंभराहून अधिक शाखा सुरू झाल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात जाण्याची हिंमत कुणामध्येही नव्हती. एचडीआयएलने सुरुवातीला कर्ज फेडले. मात्र २००८ नंतरची कर्जे थकविली. ही कर्जे देण्यासाठी बँकेने कंपनीकडून तारण ठेवलेले नव्हते. २०१२ मध्ये या कर्ज खात्यांची स्थिती आणखी बिघडली तेव्हा जॉय यांनी कंपनीला मालमत्ता तारण म्हणून ठेवण्यास भाग पाडले. प्रत्यक्षात त्यांचे मूल्यांकन केले नव्हते. या मालमत्ता ३५०० कोटींच्या आहेत, अशी नोंद मात्र करण्यात आली. एचडीआयएलला दिलेली कर्जे जॉय यांनी मंजूर केली होती.

लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल करणार
अटक आरोपींपैकी एचडीआयएलच्या राकेश आणि सारंग वाधवान पिता-पुत्रासह, बँकेचे अध्यक्ष आणि एचडीआयएलचे माजी संचालक वरियमसिंग कर्तारसिंग, व्यवस्थापक जॉय थॉमस, माजी संचालक सुरजितसिंग अरोरा यांच्याविरुद्ध पहिले ३३ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यात ३४० साक्षीदार, ९० खातेदार, १० बँक अधिकारी यांच्या जबाबांचा समावेश आहे. शिवाय आरोपींनी केलेले व्यवहार, हस्तगत केलेली कागदपत्रे, पुरावे जोडण्यात आले आहेत. अन्य आरोपींविरुद्धही लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल करू, असे आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी सांगितले.

Web Title: 3,000 water chargesheet in PMC Bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.