जयंत धुळप, अलिबागनवे वर्ष सुरू होऊन अवघे पंधरा दिवस झाले असले तरी विविध अशा १३ कारणांमुळे जिल्ह्यात १३ जणांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. यात रस्त्यांवरील अपघातांत सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जणांच्या आत्महत्यांचा समावेश आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दोन तर अकस्मात मृत्यूच्या दोन घटना आहेत. चक्कर येवून, बुडून, विंचूदंश, रक्तदाब, पोटदुखी, न्यूमोनिया आणि प्रसूती आदी कारणांमुळे जिल्ह्यात प्रत्येकी एक असे एकूण नऊ मृत्यू झाले आहेत.माणगांव, खालापूर, खोपोलीमध्ये प्रत्येकी चार असे १२, गोरेगांवात ३, कर्जत, वडखळ, नेरळ येथे प्रत्येकी दोन असे एकूण ६, पेण, पाली, दादर(पेण), मुरुड, नागोठणे, मांडवा, रोहा, पोयनाड व रसायनी येथे प्रत्येकी एक असे एकूण नऊ मृत्यू झाले आहेत.चक्कर, विंचूदंश, रक्तदाब, पोटदुखी, ताप आदी कारणास्तव झालेल्या मृत्यूंना सरकारी आरोग्य सेवेतील बेजबाबदारपणाच कारणीभूत आहे. या आजारांवर स्थानिक पातळीवर शासकीय वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून उपचार होवू शकत नसतील तर या आरोग्य सेवेचीच तपासणी सरकारने करणे आवश्यक आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी व्यक्त केले आहे.ग्रामीण भागात तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध होवू शकत नसल्याने हे मृत्यू घडत असल्याची सर्वसाधारण तक्रार ग्रामीण भागात आहे. आजारी रुग्णास उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र, उप जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व पुढे मुंबई असा प्रवास करावा लागतो आणि या प्रवासातच मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत असल्याचे जोग यांनी सांगीतला. जिल्ह्यात सरकारी डॉक्टरांची अपुरी संख्या हे एक प्रमुख कारण आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण आल्यावर तेथे डॉक्टर नसल्याने जवळच्या उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. तेथे डॉक्टरांच्या प्रमाणात रुग्ण संख्या अधिक होत असेल तर त्या रुग्णास अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात तो रुग्ण पोहोचेपर्यंत त्याची प्रकृती गंभीर होते आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णास मुंबईतील सायन रुग्णालयात पाठविण्यात येते. या प्रवासातच रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूवीर्ही घडल्या असल्याचे जोग यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना रुग्णाच्या आजाराचे गांभीर्य लक्षात आल्यावर त्या रुग्णास थेट अलिबाग वा सायन येथील रुग्णालयात पाठविल्यास मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांवर येवू शकेल असाही दावा जोग यांनी केला आहे.‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा कार्यान्वित असतानाही रुग्ण रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो का याबाबत योग्य उपाययोजना करता येईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी दिली आहे.
जिल्ह्यात पंधरा दिवसात ३० मृत्यू
By admin | Updated: January 15, 2015 23:05 IST