गेल्या २४ तासात घडल्या आगीच्या ३ घटना; मोठ्या प्रमाणावर वित्तहानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 07:56 PM2020-06-25T19:56:26+5:302020-06-25T21:36:58+5:30

लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

3 fire incidents in last 24 hours in mumbai; Large financial losses | गेल्या २४ तासात घडल्या आगीच्या ३ घटना; मोठ्या प्रमाणावर वित्तहानी

गेल्या २४ तासात घडल्या आगीच्या ३ घटना; मोठ्या प्रमाणावर वित्तहानी

Next
ठळक मुद्दे बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील नंदधाम इंडस्ट्रीयल इस्टेट, नरिमन पॉइंट येथील जॉली मेकर चेंबर २ येथे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आणि लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ येथील आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर, संगणक, युपीएस बॅटरी, ऑफीस रेकॉर्ड, फाईल्स, सिलिंग जळून खाक झाले. बँक ऑफ बहरिन अँड कुवेतचे हे साहित्य असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील आगीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्या २४ तासांत म्हणजे बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात तब्बल ३ ठिकाणी आग लागल्याल्या घटना घडल्या आहेत. या तिन्ही आगीमध्ये मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली असून, सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील नंदधाम इंडस्ट्रीयल इस्टेट, नरिमन पॉइंट येथील जॉली मेकर चेंबर २ येथे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आणि लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या तिन्ही आगी लागल्या.  

बुधवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास अंधेरी पूर्वेकडील नंदधाम इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच फायर इंजिनच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले. सात जम्बो टँकर, एक वॉटर टँकर, एक फोम टेंडर, एक क्विक रिस्पॉन्स व्हेकिलच्या मदतीने आग शमविण्याच्या कामाने वेग घेतला. येथील एकमेकांना लागून असलेल्या तीन ते चार गाळ्यातील डिझेल ऑईल ड्रम, प्लास्टिक पॅकेजिंग साहित्याला लागलेली आग शमविताना अग्निशमन दलास काहीशा अडथळ्यांना सामोरे जावे लागले. येथील आगीत तळमजल्यावरील गाळ्यातील इलेक्ट्रिक साहित्य, वायरिंग, फर्निचर, एसी, ऑफीस रेकॉर्ड, ऑफीस फाईल, फायड्रोलिक सिलिंडरसह उर्वरित साहित्य जळून खाक झाले. गुरुवारी पहाटे चार वाजता नियंत्रणाखाली आलेली आग सकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास शमली. दरम्यान, ही आग शमविताना अग्निशमन दलाचे जवान घोष जखमी झाले. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नरिमन पॉइंट येथील जॉली मेकर चेंबर २ येथे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. येथील तळमजल्यावरील बँकेच्या सर्व्हर रुममधील साहित्याला आग लागली होती. आगीमुळे येथे मोठया प्रमाणावर धूर पसरला होता. येथील आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, फर्निचर, संगणक, युपीएस बॅटरी, ऑफीस रेकॉर्ड, फाईल्स, सिलिंग जळून खाक झाले. बँक ऑफ बहरिन अँड कुवेतचे हे साहित्य असल्याचे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दुर्घटनाग्रस्त बँकेची फायर अलार्म सिस्टीम कार्यान्वित होती. मात्र स्प्रिंकल सिस्टीम मात्र कार्यान्वित नव्हती. शिवाय इमारतीची फायर फायटिंग सिस्टीमदेखील कार्यान्वित असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.



लोअर परळ येथील रघुवंशी मॉल कम्पाऊंड येथील पी २ इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. व्यावसायिक इमारतीच्या तळमजला, पहिला आणि दुसरा मजला आगीमुळे धूराच्या छायेखाली गेला होता. आठ फायर इंजिन, सहा जम्बो टँकरच्या मदतीने येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, या तिन्ही आगीमध्ये मोठया प्रमाणावर वित्तहानी झाली असून, सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.


 

रघुवीर मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी महापौरांची घटनास्थळाला भेट

लोअर परळच्या सेनापती बापट मार्गावरील रघुवंशी मिल कंपाऊंडमधील पी - २ बिल्डिंगला आग लागल्याची घटना समजताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून आगीच्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. पेडणेकर म्हणाल्या की, प्रारंभी प्रचंड धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीचा केंद्रबिंदू शोधण्यास थोडा वेळ लागला. त्यानंतर शोध लागल्यानंतर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे महापौरांनी सांगितले. या आगीमध्ये वित्तहानी  प्रचंड प्रमाणात झाली असली तरी सद्यस्थितीत कुठलीही जीवितहानी  आढळून आले नसल्याचे महापौरांनी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

 

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

Web Title: 3 fire incidents in last 24 hours in mumbai; Large financial losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.