Join us  

२७२ पात्र भाडेकरूंना ऑनलाइन मिळाली संक्रमण सदनिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 2:29 AM

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ प्रकल्प

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे दक्षिण मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये म्हाडा संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झालेल्या २७२ पात्र भाडेकरूंना वितरित करावयाच्या पुनर्वसन सदनिका संगणकीय प्रणालीद्वारे निश्चितीचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला.कोविडच्या पार्श्वभूमीवर ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांसाठी म्हाडा मुख्यालयात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ९६८ जणांनी बघितले. संक्रमण गाळ्यात स्थलांतरित होण्यासाठी आतापर्यंत म्हाडाने पात्र भाडेकरूंपैकी ३१४ भाडेकरूंशी जागेवरच करारनामा पंजीकृत करून घेतला आहे. यापैकी २७२ भाडेकरू संक्रमण गाळ्यात स्थलांतरित झाले आहेत. संक्रमण गाळ्याच्या ऑनलाइन नोंदणीसाठी स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्कही म्हाडातर्फे भरण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी काढण्यात आलेली सोडत यापूर्वी रद्द करण्यात आली होती. आता ती पुन्हा काढण्यात आली. नेमके येथे हेच होत नसल्याने याचा निषेध म्हणून आम्ही डिलाईल रोड येथे गुरुवारी निदर्शने केली. काळे झेंडे दाखविले, अशी माहिती अखिल बीडीडी चाळी रहिवासी महासंघाचे अध्यक्ष राजू वाघमारे यांनी दिली.परवडणारी, दर्जेदार घरे बीडीडी चाळी लवकरच नवीन रूप धारण करतील. या प्रकल्पाच्या नियोजनातून मुंबई शहराची नगररचनादेखील सुटसुटीत होण्यास मदत होईल. ५ वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परवडणारी, दर्जेदार घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून द्यावीत.- आदित्य ठाकरे, पालकमंत्री, मुंबई उपनगर५ हजार एकर जमीन होणार उपलब्धसदनिका निश्चित झालेल्या सर्व भाडेकरूंबरोबर करार केला जाणार. या करारात निश्चित झालेली सदनिका, इमारतीचा क्रमांक, सदनिकेचा मजला नमूद केला जाईल. जुन्या वसाहतींचा पुनर्विकास करून परवडणाऱ्या दरातील घरे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. म्हाडाचा विस्तार मुंबईबाहेरही अधिक व्हावा यासाठी गृहनिर्माण धोरण तयार केले जात आहे. पाच वर्षांत मुंबईबाहेर परवडणाऱ्या दरातील सदनिका उभारण्यासाठी सुमारे ५ हजार एकर जमीन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहे.- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री 

टॅग्स :म्हाडा