Join us  

मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासापेक्षा २७ कोटी रुपये महत्त्वाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 2:34 AM

सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवरील १० पूल धोकादायक अवस्थेत आहेत. मात्र, महापालिकेने दुरुस्तीसाठी २७ कोटी रेल्वे प्रशासनाकडे जमा न केल्यामुळे, धोकादायक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.

- महेश चेमटेमुंबई : सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेवरील १० पूल धोकादायक अवस्थेत आहेत. मात्र, महापालिकेने दुरुस्तीसाठी २७ कोटी रेल्वे प्रशासनाकडे जमा न केल्यामुळे, धोकादायक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे. एकूणच मुंबईकरांच्या जिवापेक्षा २७ कोटी रुपये अधिक महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट होत आहे.लोअर परळ पुलाच्या उभारणीवरून महापालिका आणि रेल्वे यांच्यात अद्याप निर्णय झालेला नाही. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, रेल्वेने पूल उभारावा, त्याचा खर्च महापालिका देईल. मात्र, पश्चिम रेल्वेवरील तब्बल १० पूल जीर्ण झाले असून, त्यांची निधीअभावी दुरुस्ती रखडली आहे. या दहा पुलांसाठी पालिकेने रेल्वे प्रशासनाकडे २७ कोेटी १८ लाख ८१ हजार रुपये जमा करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने अद्याप पैसे जमा केलेले नाहीत. पैसे भरण्याबाबत पश्चिम रेल्वेने २६ जुलैला पालिकेला पाठविलेले पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे.धोकादायक १० पुलांमध्ये अंधेरी गोखले पूल, अंधेरी गोखले पुलालगत असलेला पाण्याच्या पाइप लाइनचा पूल, अंधेरी हार्बर मार्गावरील पूल, मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पूल, पोईसर नाल्यावरील पादचारी पूल, मालाड उत्तरेकडील पूल, गोरेगाव पादचारी पूल यांचा समावेश आहे.पालिका आणि रेल्वे यांच्या वादात पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अंधेरी गोखले पुलाच्या दुर्घटनेत आयआयटी, पालिका आणि रेल्वे व पश्चिम रेल्वेचे स्वतंत्र अधिकारी अशा दोन स्वतंत्र टीम पुलांची पाहणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत. रेल्वेला पैसे न मिळाल्यामुळे पुलांच्या दुरुस्तीचे काम रेंगाळल्याचे रेल्वे आणि पालिका यांच्यातील पत्रव्यवहारातून दिसून येते. यामुळे पुन्हा एकदा दोन प्रशासकीय यंत्रणांच्या भांडणात सामान्य मुंबईकर चिरडला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.महापालिकेचे अधिकारी नॉट रिचेबलपश्चिम रेल्वेवरील पुलांच्या दुरुस्तीकामाच्या निधीबाबत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एकाही अधिकाºयाने प्रतिसाद दिला नाही. (पूर्वार्ध)कामाचे नाव अंदाजे खर्च महापालिकेनेजमा केलेले रुपयेअंधेरी गोखले आरओबी २,२२,६९,००० -अंधेरी पाइप लाइन पूल ७८,३०,००० -मुंबई सेंट्रल बेलासिस पूल २२,१०,०२,००० १८,३३,४८,०००चर्चगेट-दहिसर एफओबी ८८,१६,००० -अंधेरी हार्बर लाइन स्पॅन १,०७,२८,००० -गोरेगाव-मालाड एफओबी ३३,३५,००० -मालाड स्कायवॉक ५,४५,१३,००० -मालाड (उत्तर) एफओबी १,०१,९६,००० -पोईसर नाला एफओबी २,१७,४७,००० -चर्चगेट-दहिसर आरओबी पायरी ९,४७,५३,००० -एकूण ४५,५१,८९,००० १८,३३,४८,०००

टॅग्स :मुंबई