Join us

गोरेगावमधून २६ किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:24 IST

मुंबई : गोरेगाव परिसरातून ५ लाख २० हजार किमतीचा २६ किलो गांजा गुरुवारी जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या ...

मुंबई : गोरेगाव परिसरातून ५ लाख २० हजार किमतीचा २६ किलो गांजा गुरुवारी जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ८ने ही कारवाई केली. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.

...............................................

घरातून मोबाइलसह रोकड चोरीला

मुंबई : नायगाव परिसरात राहणाऱ्या बिलाल हुसेन यांच्या घरातून ३० हजार रुपयांच्या मोबाइलसह १८ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

..........................................

चिमुकल्यांंच्या भांडणात दुसऱ्यालाच मार

मुंबई : शेजारच्या ६ वर्षीय मुलीने ५ वर्षांच्या बहिणीसोबत भांडण केल्याच्या रागात तरुणाने भांडण करणाऱ्या मुलीच्या बहिणीलाच मारहाण केल्याची घटना धारावीत घडली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंद केला असून ते अधिक तपास करत आहेत.

.........................