लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा मोटर्सने बनवलेल्या भाडेतत्त्वावरील २६ वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्या असून, या बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मुरली देवरा चौक, नरिमन पॉइंट येथे होणार आहे, अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी दिली. नव्याने दाखल झालेल्या या बस त्यानंतर प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. भाडेतत्त्वावरील ४० आणि बेस्टच्या मालकीच्या ६ इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यामध्ये कार्यरत आहेत. बेस्टकडे आता ३ हजार ८७५ बसगाड्यांचा ताफा आहे. यामध्ये १ हजार ९९ भाडेतत्त्वावरील बसगाड्यांचा समावेश आहे. २०२२मध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्यांची संख्या ३ हजार असणार आहे.