Join us  

शिवडी किल्ल्यावर २०० किलो कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 2:11 AM

सह्याद्री प्रतिष्ठानची स्वच्छता; गड संवर्धन व वृक्ष लागवड मोहिम

मुंबई : सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने शिवडी किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. रविवारी शिवडी किल्ल्यावरून २०० किलो कचरा शिवप्रेमींना गोळा केला. राज्यात २६ किल्ल्यांवर गड संवर्धन आणि वृक्षारोपण मोहिम आयोजित करण्यात आली होती. याच मोहिमेअंतर्गत सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागाने शिवडी किल्ल्यावर दुर्ग संवर्धन व स्वच्छता मोहिम राबवली.शिवडी किल्ल्यावरील कानेकोपरे स्वच्छ करण्यात आले. याशिवाय प्लॅस्टिक बाटल्या, मद्याच्या बाटल्या, गुटख्यांची पाकिटे, सुका पाला-पाचोळा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागाचे अध्यक्ष रोहीत देशमुख, गणेश मांगले, सह संपर्क प्रमुख रूपेश ढेरंगे व सह्याद्री प्रतिष्ठानचे ४० स्वयंसेवक आणि कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

टॅग्स :गड