Join us  

२00 महागड्या गाड्या आरटीओच्या जाळ्यात

By admin | Published: January 30, 2017 4:09 AM

परराज्यात कमी असलेला कर आणि त्यामुळे वाहननोंदणी करून, नंतर छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात ‘आलिशान’ गाड्या चालवणाऱ्यांविरोधात आता राज्याच्या परिवहन विभागाने धडक

मुंबई : परराज्यात कमी असलेला कर आणि त्यामुळे वाहननोंदणी करून, नंतर छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात ‘आलिशान’ गाड्या चालवणाऱ्यांविरोधात आता राज्याच्या परिवहन विभागाने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. १८ जानेवारीपासून सुरू केलेल्या या कारवाईत आतापर्यंत २00 पेक्षा अधिक महागड्या आणि आलिशान गाड्या पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र सोडता काही राज्यांत वाहनकर हा जवळपास ५ टक्के आहे, तर महाराष्ट्रात हाच कर जवळपास २0 टक्के एवढा आहे. त्यामुळे कमी कर असणाऱ्या राज्यात वाहननोंदणी केल्यानंतर, कर चुकवून ही वाहने नंतर महाराष्ट्रात चालवली जातात. अशा वाहनांविरोधात राज्याच्या परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते. १८ जानेवारीपासून परिवहन विभागाकडून महाराष्ट्राबाहेर नोंदणी करणाऱ्या आणि कर चुकवणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई केली जात आहे. जवळपास २00 पेक्षा आलिशान व महागड्या गाड्या पकडण्यात आल्या आहेत. यामध्ये मर्सिडीज, बीएमडब्लू, आॅडी अशा गाड्यांचा समावेश आहे. या संदर्भात उपपरिवहन आयुक्त (अंमलबजावणी) प्रदीप शिंदे यांनी सांगितले की,कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये २५ लाखांपेक्षा अधिक किमतीची आलिशान वाहने आहेत. सर्वाधिक परराज्यात वाहननोंदणी होणाऱ्यांमध्ये पुदुचेरी, झारखंड, दमण दिवा यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये २५ लाखांपेक्षा अधिक किमतीची वाहने आहेत. ही कारवाई सुरू असतानाच, आता विमानतळ, हॉटेल, क्लब येथेही तपासणी मोहीम लवकरच घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)