दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर मोठा खर्च झाल्याची बाब ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या कागदपत्रांवरून दिसून आली असून, एका सर्व्हंट क्वॉर्टरवर २ कोटींवर खर्च झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहर विभागाने दरवर्षी मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करण्याचा हा पराक्रम केल्याचा आरोप करत वें. ल. पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
मागील सहा महिन्यांत शासकीय बंगल्यांवर ३० कोटींची कामे काढल्याचा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणला होता. यात अधिक माहिती घेतली असता २०२१-२२ व २०२२-२३ या दोन आर्थिक वर्षांत मलबार हिल आणि मंत्रालयासमोरील मंत्री बंगल्यांचे नूतनीकरण आणि दुरुस्तीवर ६६ कोटी रुपये खर्च झाल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे बंगल्यात राहणारे मंत्रीही अनभिज्ञ असल्याचे ‘लोकमत’ने काही मंत्र्यांशी संपर्क केल्यानंतर समोर आले आहे.
बंगल्याचे नाव खर्च २०२१-२३ या वर्षात मागील सहा महिन्यात शिवगिरी ३.५४ कोटी २.०९ कोटीशिवगड १.७५ कोटी १.०४ कोटीपावनगड १.२९ कोटी ८३. २ लाखपर्णकुटी ३.२१ कोटी १.४९ कोटीरॉयलस्टोन ८८.६८ लाख १.५८कोटीअग्रदूत ३.५४ कोटी १६.८३ लाखनंदनवन ८२ लाख १६.९४ लाखरामटेक २. ०४ कोटी ७५.४ लाखमुक्तगिरी-ज्ञानेश्वरी ८.१७ कोटी ३.३६ कोटीशिवनेरी १.९३ कोटी १.७२ कोटीसेवासदन २.०८ कोटी १६.८४ लाख देवगिरी १.५२ कोटी १९.८९लाखजेतवन-सातपुडा २ कोटी १.२३ कोटीतोरणा १.५४ कोटी ४. ६४ कोटीप्रतापगड १.६० कोटी ३५.९९ लाखरायगड १.१२ कोटी ७६.८ लाखलोहगड १.६१ कोटी ८७.४६ लाखसिंहगड २.९७ कोटी ५२.३७ लाखरत्नसिंधू २.५४ कोटी ४५.८१ लाखजंजिरा ७९.२ लाख १.१२ कोटीविजयदुर्ग १.२० कोटी १.५३कोटीसुवर्णगड १.३५ कोटी ७३ लाखअजिंक्यतारा ८९.६ लाख ८०.४ लाखब्रह्मगिरी ५४ लाख १.५७ कोटीराजगड १.१८ कोटी ४६.२३ लाखचित्रकूट ३.४८कोटी २.७६ कोटी बी -६ ६९.३ लाख ७२.७ लाख बी-७ ५२.९ लाख १६.८१ लाख
----००००----