Join us  

१९ लाख प्रवाशांची घुसमट कायम, तातडीने तोडगा काढणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 6:49 AM

 मध्य रेल्वेने १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेºया सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरीही त्या फेºयांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळालेला नाहीच; उलट त्यांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले आहे.

- अनिकेत घमंडीडोंबिवली -  मध्य रेल्वेने १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेºया सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरीही त्या फेºयांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळालेला नाहीच; उलट त्यांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले आहे. नोव्हेंबर - डिसेंबर या ६० दिवसांचा अभ्यास केला तर रोज विविध तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजल्याचे निदर्शनास येईल. एकही दिवस लोकल वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे रोजचा प्रवास दडपणाखाली आणि प्रचंड गर्दीमुळे लोंढ्यात कशीबशी जागा मिळवत घुसमट सहन करीत करावा लागत आहे. आता मात्र ती घुसटम प्रवाशांना असह्य होऊ लागल्याने त्याचे पडसाद उमटायला लागले आहेत. त्यामुळेच कसारा मार्गावर कधी वासिंद, आसनगाव तर कधी अन्य ठिकाणचे प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी बिनधास्तपणे रेल रोको करायला लागले आहेत.रेल्वेच्या वाणिज्य विभागातील अधिकाºयांनीच ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, ठाणे - ६ लाख, कळवा -७५ हजार, मुंब्रा - ९० हजार, दिवा - १ लाख, कोपर - ६०, डोंबिवली - २.५ लाख, ठाकुर्ली - २५ हजार, कल्याण - २ लाख, उल्हासनगर ते बदलापूर सुमारे ३ लाख, शहाड ते कसारा मार्गावर सुमारे १ लाख असे एकूण सुमारे १८ लाख प्रवासी प्रति दिन मध्य रेल्वेने प्रवास करतात. यापैकी रेल्वेच्या आकडेवारीनुसार ठाणे ते ठाकुर्ली मार्गावरील तिकिटांमुळे प्रति दिन ८६ लाख रुपयांची उलाढाल होते. त्या तुलनेत १८ लाखांच्या लोंढ्यापुढे १ नोव्हेंबरपासून नाममात्र वाढवलेल्या १६ लोकल फेºया दिलासा देऊ शकणार नाहीत, प्रवाशांची घुसमट वाढतच जाणार हे स्पष्ट झाले आहे.९ डिसेंबर रोजी वासिंद स्थानकात तर त्याआधी नोव्हेंबरमध्येच आसनगाव स्थानकात प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उतरून रेल्वे प्रशासनाचा निषेध केला होता. प्रवाशांच्या गर्दीवर मात्रा म्हणून नोव्हेंबरपासून ज्या फेºया वाढवल्या आहेत त्यात दादर-बदलापूर - २, दादर-टिटवाळा - २, दादर-डोंबिवली - ६ आणि कुर्ला - कल्याण - ६ अशा वाढीव फेºयांचा समावेश आहे. त्यात कुठेही ठाणे-कर्जत-कसारा या मार्गावरील फेºयांचा समावेश नाही. परिणामी, ठाणे स्थानकातील परतीच्या ६ लाख प्रवाशांपैकी किमान ३ लाख प्रवाशांची गैरसोय कायम राहणार असल्याचे रेल्वेचे जाणकार अभ्यासक अधिकारी सांगतात.तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत रेल्वे गर्दीची समस्या-उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी प्रवासी संघटनेची बैठक घेतली. त्या चर्चेत संघटनांनी नोकºयांचे विकेंद्रीकरण करा, नोकºयांच्या वेळा बदला (तीन शिफ्टमध्ये) असे म्हटले होते. त्याची प्रभूंनी नोंद घेत या सूचनांचे स्वागत करत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्याचे पुढे काय झाले हे गुलदस्त्यातच असल्याचे वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी सांगितले.कसारा-कर्जत मार्गावरील प्रवासी हा नोकरीसाठी ठाणे, घाटकोपर, दादर अगदी सीएसएमटी, पनवेलपर्यंत जातो. त्या प्रवाशांना रेल्वे समांतर रस्ता म्हणजे पर्यायच नसल्याने रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. रेल्वे ठप्प झाली की त्या दिवसाच्या रोजगारावर पाणी सोडावे लागत असल्याचे मत कर्जतचे रहिवासी, रेल्वेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे पंकज ओसवाल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मुंबई लोकलठाणे