Join us  

मोफत वाहन सुविधेसाठी १८६ दिव्यांग मतदारांची नावनोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 2:35 AM

घर ते मतदान केंद्र सुविधा : मोबाइलवर एसएमएस पाठविण्याचे आवाहन, ३४४ वाहनांचे नियोजन

मुंबई : दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावे याकरिता २९ एप्रिल रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींची नावनोंदणी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रातून शुक्रवारपर्यंत १८६ दिव्यांग मतदारांनी सुविधेसाठी नावनोंदणी केली आहे. १०३ दिव्यांग मतदारांची नोंदणी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात झाली आहे. आतापर्यंत ३४४ वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार वाहनांची संख्या वाढविण्यात येणार आहे.मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग मतदार मदत केंद्र यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. दिव्यांग मदत केंद्राद्वारे संपर्क क्रमांक उपलब्ध असलेल्या दिव्यांग मतदारांशी दूरध्वनी संपर्क साधून त्यांना मतदानाच्या दिवशी त्यांचे निवासस्थान ते मतदान केंद्र ते निवासस्थान यादरम्यानच्या प्रवासासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सुविधेची माहिती देण्यात येत आहे. नावनोंदणी करण्यात येत आहे. आतापर्यंत १८३ मतदारांनी सुविधेसाठी नावनोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या दिव्यांग मतदारांना मतदानाच्या दिवशी त्यांना घेण्यासाठी येत असलेल्या वाहनाचा क्रमांक व वेळ दिव्यांग मतदाराच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.दिव्यांगमतदारांची नोंदणीउत्तर मुंबई - १७उत्तर पश्चिम मुंबई - ३८उत्तर पूर्व मुंबई - २४उत्तर मध्य मुंबई - १०३दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश हा मुंबई उपनगर जिल्ह्यात होतो. या मतदारसंघ क्षेत्रातून ४ दिव्यांग मतदारांनी मोफत वाहन सुविधेसाठी नोंदणी केली आहे.नावनोंदणी करामुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांनी सुविधेसाठी नावनोंदणी करावी. सुविधेचा लाभघ्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.मोफत वाहन सुविधामोफत वाहन सुविधेच्या नोंदणीसाठी दिव्यांग मतदारांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी दिव्यांग मतदाराचे नाव, त्यांचा मतदार क्रमांक व लोकसभा मतदारसंघ क्रमांक आदी तपशील लघुसंदेशाद्वारे किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे ९८६९-५१५-९५२ किंवा ८६५५-२३५-७१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठविल्यास वाहन नोंदणी करण्यात येत आहे.अडचण येणार नाहीमतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जागृती मोहीमही राबविली जात आहे.महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हामतदारसंघ, मतदान केंद्र व मतदार संख्या यांचा विचार करता मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा जिल्हा आहे.अशा आहेत सुविधामतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग तसेच डोली आदी सुविधा असणार आहेत.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019दिव्यांग