Join us

ठाण्यातील 181 शौचालये गॅसवर

By admin | Updated: October 30, 2014 22:37 IST

लोकमान्यनगरात शौचालयाच्या टाकीच्या स्फोटात एका अकरावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील सर्वच शौचालयांच्या साफसफाईबरोबर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठाणो : लोकमान्यनगरात शौचालयाच्या टाकीच्या स्फोटात एका अकरावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील सर्वच शौचालयांच्या साफसफाईबरोबर स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे शहरातील 181 शौचालयांच्या ठिकाणी सक्शन पंप पोहोचू शकत नसल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या शौचालयांच्या सेफ्टी टँकची साफसफाई झाली नसल्याची माहितीदेखील समोर आली आहे. त्यामुळे ही शौचालये गॅसवरच असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. 
बुधवारी रात्री 1क्.3क् च्या सुमारास लोकमान्यनगर भागात असलेल्या 1क् सीट्सच्या शौचालयाच्या ठिकाणी झालेल्या स्फोटात अकरावर्षीय मुलगा जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या शौचालयाच्या ठिकाणी सक्शन पंप पोहोचू शकत नसल्याने मागील कित्येक वर्षे या शौचालयाच्या सेफ्टी टँकची साफसफाई झाली नव्हती. 
तसेच या शौचालयाला आऊट लेटही काढण्यात आला नव्हता. त्यामुळेच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेष म्हणजे जुलैमध्येदेखील अशाच प्रकारची घटना घडली होती. या घटनेत एक महिला जखमी झाली होती. मागील वर्षी घडलेल्या घटनेत एक जण जखमी झाला होता. एकामागून एक घडणा:या शौचालयांच्या दुर्घटनांमुळे शौचालयांच्या साफसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
दरम्यान, लोकमान्यनगर येथे घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या पाश्र्वभूमीवर महापौर संजय मोरे यांनी महापालिका कार्यक्षेत्रतील सार्वजनिक शौचालयांची साफसफाई व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बोलवली होती. या वेळी शहरातील सर्वच सार्वजनिक शौचालयांची माहिती त्यांनी घेतली. या बैठकीला आयुक्त असीम गुप्ता, उपमहापौर राजेंद्र साप्ते, विविध पक्षांचे गटनेते आदींसह आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. 
 
शहरातील ज्या 181 ठिकाणी गाडय़ा जाऊ शकत नाहीत, त्या ठिकाणची शौचालये स्थलांतरित करण्याचा निर्णय पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतला आहे. या सर्व शौचालयांचा सव्र्हे करून किती ठिकाणी साफसफाई करता येऊ शकते, याची माहिती घेतली जाणार असून त्यानुसार सफाईसाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी काय करता येईल, यासंदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिका:यांना गुरुवारी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये दिल्या आहेत. 
 
चारपैकी दोन गाडय़ा बंद 
4शहरातील शौचालयांच्या टाक्यातील मल काढण्यासाठी पालिकेजवळ केवळ चारच सक्शन पंपाच्या गाडय़ा असून त्यापैकी दोन बंद आहेत. चालू असलेल्या दोन गाडय़ांनाच पालिकेच्या शौचालयांबरोबरच काही सोसायटय़ांच्या टाक्या साफ कराव्या लागत असल्याने गाडय़ांना कसरत करावी लागते. 
 
बहुतेक शौचालये 
3क् ते 35 वर्षे जुनी
4केवळ लोकमान्यनगर परिसरातील  अशा प्रकारचे हे एकच शौचालय नसून ठाण्यात अशी 181 ठिकाणो अशी आहेत की, जिथे सक्शन पंपाची गाडी जाऊ शकत नसल्याची कबुली खुद्द पालिकेच्या अधिका:यांनी दिली आहे. 
4त्यामुळे गेले कित्येक महिने साफ न झालेल्या या शौचालयांमध्येदेखील अशा प्रकारची घटना कधीही घडू शकते. अनेक शौचालये 3क् ते 35 वर्षे जुनी असल्याने त्यांची देखभालदेखील केली जात नसल्याची बाब समोर आली आहे. 
4दुसरीकडे यासंदर्भात पालिका अधिका:यांकडे माहिती घेतली असता 181 ठिकाणी जरी सक्शन पंप जाऊ शकत नसले तरीदेखील 364 ठिकाणी सक्शन पंप जाऊ शकतात, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.