Join us  

१ नोव्हेंबरपासून १८ लोकल वाढणार, दिव्यात अजून २२ जलद गाड्यांना थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 6:22 AM

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून १८ लोकल गाड्यांच्या फे-या वाढवण्यात येणार आहेत. या वाढीव फे-यांचा फायदा डोंबिवलीसह टिटवाळा, कसारा, बदलापूर आणि कर्जत स्थानकांना होणार आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर १ नोव्हेंबरपासून १८ लोकल गाड्यांच्या फे-या वाढवण्यात येणार आहेत. या वाढीव फे-यांचा फायदा डोंबिवलीसह टिटवाळा, कसारा, बदलापूर आणि कर्जत स्थानकांना होणार आहे. दिवा स्थानकातील वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता येथे एकूण ४६ जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे. सध्या दिवा स्थानकात २४ जलद लोकल थांबतात. नवीन वेळापत्रकात हे बदल होणार आहेत. मध्य मार्गावर एकूण २५ लोकल फे-या वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सोबत सध्या सुरू असलेल्या ७ लोकल फेºया रद्द करण्याची शिफारस मध्य रेल्वेतर्फे रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली होती. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून नवीन १८ फेºया वाढणार आहेत. बदलापूर स्थानकातून २ फेºया (१ अप-१ डाऊन), कर्जत २ फेºया, खोपोली ४ फेºया, कसारा २ फेºया, टिटवाळा २ फेºया, डोंबिवलीतून ६ फे-या वाढवण्यात येणार आहेत.मध्य रेल्वे मार्गावर रोज ८३८ लोकल फे-या होतात. वाढीव १८ फे-यांमुळे ही संख्या ८५६ झाली आहे.>महिलांसाठी तीन डबे राखीवमहिला प्रवाशांसाठी ८ वाजून १० मिनिटांनी सुटणा-या टिटवाळा-दादर अप लोकलमध्ये कसारा दिशेकडील शेवटचे तीन डबे महिलांसाठी राखीव ठेवणार आहेत. तर ८ वाजून ४५ मिनिटांनी सुटणाºया बदलापूर-दादर लोकलमधील कर्जत दिशेकडील शेवटचे तीन डबे महिलांसाठी राखीव ठेवणार आहेत.रात्री लवकर निघा१ नोव्हेंबरपासून शेवटच्या लोकलच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे शेवटच्या कर्जत आणि कसारा लोकलच्या वेळेतही काही मिनिटांचा फरक पडणार आहे. परिणामी रात्री उशिरा प्रवास करणाºयांना लवकर फलाटावर पोहोचावे लागणार आहे.>रद्द करण्यात आलेल्या लोकलकुर्ला-अंबरनाथ - ०४.४४सीएसएमटी-अंबरनाथ - ०७.०५अंबरनाथ-सीएसएमटी -२०.२९टिटवाळा-आसनगाव - ०५.०५टिटवाळा-कुर्ला - २३.४६आसनगाव-कल्याण - २३.३२सीएसएमटी-टिटवाळा २२.२०लोकल (डाऊन) पूर्वीची बदललेलीवेळ वेळसीएसएमटी-ठाणे ००.३४ ००.३१सीएसएमटी-कर्जत ००.३० ००.२०कुर्ला - ठाणे ०१.०२ ००.५६ठाणे-कल्याण ०१.२४ ०१.१९कल्याण-कर्जत ०१.५७ ०१.५२लोकलच्या वेळेत बदललोकल पूर्वीची वेळ बदलणारी वेळसीएसएमटी-कर्जत रा.१२.३० वा. रा.१२.२०वा.सीएसएमटी-बदलापूर स.७.२५ वा. स.८.२९वा.सीएसएमटी-खोपोली स.७.५३वा. स.७.३०वा.सीएसएमटी-कर्जत स.८.२९वा. स.८.१६वा.सीएसएमटी-कर्जत स.९.०८वा. स.९.०१वा.कसारा-सीएसएमटी रा.१०.३५वा. रा.१०.०५वा.बदलापूर-सीएसएमटी रा.११.५०वा. रा.११.३१वा.

टॅग्स :रेल्वे प्रवासी