Join us  

११ ऑक्टोबरपर्यंत मलेरियाचे १६० रुग्ण; आजारावर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 12:30 AM

BMC News: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, हिवताप, काविळ असे विविध आजार पसरतात. यंदा कोरोनाचे संकट ओढावल्याने पावसाळी आजारांना रोखणे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान होते.

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणारे मलेरिया, डेंग्यू, काविळ, स्वाइन फ्लू या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ५३६ मलेरियाचे रुग्ण आढळले होते. मात्र, यावर्षी ११ ऑक्टोबरपर्यंत १६० रुग्ण आढळल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध आजारांची रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसले.

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, हिवताप, काविळ असे विविध आजार पसरतात. यंदा कोरोनाचे संकट ओढावल्याने पावसाळी आजारांना रोखणे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान होते. मात्र, कोरोनापाठोपाठ पावसाळी आजारांवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. मुंबईभरात जंतुनाशक फवारणी, डास प्रतिबंधक फवारणी करणे, घरोघरी जाऊन तपासणी करणे, स्वच्छता उपक्रम, नागरिकांमध्ये पावसाळी आणि साथीचे आजार रोखण्यासाठी आवश्यक जनजागृती करणे यामुळे चांगलेच यश आले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर  महिन्यात लेप्टोमुळे एक आणि डेंग्यूमुळे दोन जणांना जीव गमवावा लागला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या कमीचआजार    २०१९    २०२०मलेरिया    ५३६    १६०लेप्टो    ३०    १५डेंग्यू    ४२    ०१गॅस्ट्रो    ३८६    ३१हिपेटायटिस    ७०    ०३स्वाइन फ्लू    ०४    ००

टॅग्स :मुंबई महानगरपालिका