महाज्योती, सारथी, बार्टीसाठी प्रत्येकी १५० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 02:53 AM2021-03-09T02:53:12+5:302021-03-09T02:54:28+5:30

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास भागभांडवलाकरिता १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

150 crore each for Mahajyoti, Sarathi, Barti | महाज्योती, सारथी, बार्टीसाठी प्रत्येकी १५० कोटी रुपये

महाज्योती, सारथी, बार्टीसाठी प्रत्येकी १५० कोटी रुपये

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वेगवेगळया समाजघटकांच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थांसाठी प्रत्येकी १५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी १०० कोटी एवढे अतिरिक्त भागभांडवल उपलब्ध करून देण्यात येत आहे. श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ-महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाची कोकण विभागाकरिता उपकंपनी असलेल्या श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी रुपये अतिरिक्त भागभांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास भागभांडवलाकरिता १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ-वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाला भागभांडवलाकरिता १०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बहुजन कल्याण विभागासाठी एकूण तरतूद ३,२१० कोटी रुपयांची असेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींकरिता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविली जाणार आहे. राबविण्याचे प्रस्तावित आहे. बहुजन कल्याण विभागासाठी एकूण तरतूद ३,२१० कोटी रुपयांची असेल. डोंगरी विभागातील गावे, वाड्या-वस्त्या तसेच डोंगरपठारावरील वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डोंगरी विकास निधी व इतर योजनांतून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. विमुक्त जाती, भटक्या जमाती, आदिवासी तसेच धनगर समाजाच्या वस्त्यांमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद आहे.

मौलाना आझाद महामंडळास २०० कोटी
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला २०० कोटी रुपयांचे भागभांडवल देण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील हजरत ख्वाजा शमनामिरा दर्गा परिसराच्या विकासाकरिता पुरेसा निधी देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विभागासाठी ५८९ कोटींची तरतूद आहे.
साठे महामंडळ मात्र कोरडेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळासाठी नव्याने तरतूद नाही. अण्णा भाऊ साठे यांच्या मुंबईतील स्मारकासाठीही तरतूद नाही.

Web Title: 150 crore each for Mahajyoti, Sarathi, Barti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.