Join us  

ट्रकच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 2:02 AM

ट्रकच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चेंबुरमध्ये घडली. प्रेयश पेडामकर असे मृत मुलाचे नाव आहे.

मुंबई : ट्रकच्या धडकेत १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी चेंबुरमध्ये घडली. प्रेयश पेडामकर असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी प्रेयशच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन टिळकनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास केला.पवई परिसरात प्रेयश हा आई वडील भावासोबत राहायचा. मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रेयश हा भाऊ घनश्याम सोबत दुचाकीने अमर महल ब्रीज चढताना भरधाव ट्रकच्या धडकेत त्याचाअपघात झाला. या अपघातात प्रेयशचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पेडामकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.