26/11 Terror Attack : कसाबला जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळेंसह १४ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 02:54 PM2020-03-04T14:54:53+5:302020-03-04T14:59:00+5:30

26/11 Terror Attack : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

14 police officers promoted along with martyr Tukaram Ombale who arrested Kasab alive in 26/11 terror attack pda | 26/11 Terror Attack : कसाबला जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळेंसह १४ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती

26/11 Terror Attack : कसाबला जिवंत पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबळेंसह १४ पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती

googlenewsNext
ठळक मुद्देअजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना एक टप्पा पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.या सर्व १४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना आता एक टप्पा पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुंबई - २६/११ च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना एक टप्पा पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.



अजमल कसाब याला जिवंत पकडताना तुकाराम ओंबळे यांना वीरमरण आलं होतं. शहीद तुकाराम ओंबळे यांच्यासह १४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले होते. त्यांना शौर्यपदकाने गौरवविण्यात आले होते. या सर्व १४ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना आता एक टप्पा पदोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Web Title: 14 police officers promoted along with martyr Tukaram Ombale who arrested Kasab alive in 26/11 terror attack pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.