Join us  

यंदाच्या ‘नीट’साठी १३ लाख परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:12 AM

गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या दोन लाखांनी अधिक आहे.

नवी दिल्ली : देशभरातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस व बीडीएस) प्रवेशांसाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेसाठी यंदा १३.३६ लाख विद्यार्थी बसणार आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या दोन लाखांनी अधिक आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) ही परीक्षा येत्या ६ मे रोजी देशभरातील केंद्रांवर घेतली जाणार आहे. देशात सरकारी व खासगी महाविद्यालयांमध्ये मिळून पदवी अभ्यासक्रमाच्या ६० हजार जागा उपलब्ध आहेत. या जागांच्या तुलनेत २० पट अधिक विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देणार असल्याने यंदा प्रवेशांमधील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. या परीक्षेची ‘अ‍ॅडमिट कार्ड’ सीबीएसईने बुधवारी वेबसाइटवर अपलोड केली. परीक्षार्थीने त्याचे ‘अ‍ॅडमिट कार्ड’ डाऊनलोड केल्यावर पीडीएफ स्वरूपामध्ये ते त्याच्या मेल अ‍ॅड्रेसवर मेले केले जाते. त्याची परीक्षार्थींनी प्रिंट काढून घ्यायची आहे. परीक्षेला जाताना काय करावे व काय करू नये, कोणते कपडे परिधान करावेत, याची नियमावली या अ‍ॅडमिट कार्डच्या मागील बाजूस छापलेली आहे.

टॅग्स :परीक्षा