Join us  

१२३ विद्यार्थी देणार आयडॉलमधून परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 7:10 AM

उपस्थिती कमी असल्यामुळे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आता आयडॉलमधून परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आयडॉलमध्ये प्रवेशप्रक्रिया झाली असून, १२३ विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आहे.

मुंबई : उपस्थिती कमी असल्यामुळे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आता आयडॉलमधून परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आयडॉलमध्ये प्रवेशप्रक्रिया झाली असून, १२३ विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आहे. आयडॉलमध्ये प्रवेश नोंदवल्यानंतर या विद्यार्थ्यांना आयडॉकडून अभ्यास साहित्य पुरवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.कमी हजेरी असल्याने काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करत या विद्यार्थ्यांना कला व वाणिज्य शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या उन्हाळी परीक्षांना बसण्याची परवानगी नाकारली होती. याबाबत काही विद्यार्थ्यांच्या पालकांनीमुंबई विद्यापीठाकडे तक्रारहीनोंदवली.कारवाई नियमाप्रमाणे झाल्याने संबंधित महाविद्यालये आपल्या भूमिकेवर ठाम राहिलीहोती.त्यानंतर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आयडॉलमधून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार अ‍ॅकॅडमिक कौन्सिलची मान्यता मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांना १० मे रोजी आयडॉलमध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.तारीख दीड महिन्यापूर्वीच जाहीरमुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमधील बीएस्सी आयटी सेमिस्टर ६ या परीक्षेची तारीख आयडॉलने ३१ मार्च २०१८ रोजी जाहीर केली होती. त्यामुळे विध्यार्थ्यांनी एक आठवडा आधी परीक्षेची तारीख जाहीर केली, असे म्हणणे योग्य नसल्याचा दावा मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.त्यामुळे ही परीक्षा १४ मे २०१८पासून सुरू करण्यावर विद्यापीठ ठाम असून, या परीक्षेचे हॉलतिकीट गुरुवारपासूनच विद्यार्थ्यांच्या लॉगइन आयडीवर देण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राचा पत्ताही देण्यात आला आहे.

टॅग्स :परीक्षाबातम्या