राज्यात आढळले १२,२०७ नवे कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:20+5:302021-06-11T04:06:20+5:30

मुंबई : राज्यात गुरुवारी १२ हजार २०७ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ३९३ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे ...

12,207 new corona patients found in the state | राज्यात आढळले १२,२०७ नवे कोरोना रुग्ण

राज्यात आढळले १२,२०७ नवे कोरोना रुग्ण

Next

मुंबई : राज्यात गुरुवारी १२ हजार २०७ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून ३९३ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ८७ झाली असून मृतांचा आकडा १ लाख ३ हजार ७४८ झाला आहे. सध्या १ लाख ६० हजार ६९३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात गुरुवारी ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ५६ लाख ८ हजार ७५३ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४५ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ७३ लाख ५६ हजार ७०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.७३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १० लाख ७६ हजार १६५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ६ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Web Title: 12,207 new corona patients found in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.