Join us  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ विशेष लोकल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 5:32 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे एकत्र येतात. यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष लोकल फेºया चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे एकत्र येतात. यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष लोकल फेºया चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दादर-कुर्ला-ठाणे-कल्याण आणि कुर्ला-मानखुर्द-वाशी-पनवेल या मार्गावर ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकलचालवण्यात येणार आहे. विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहे.मध्य मार्गावर अप दिशेला दादर-ठाणे विशेष लोकल दादर येथून रात्री १.१५ वाजता सुटणार असून १.५५ वाजता ठाणे स्थानकात पोहचणार आहे. दादर-कल्याण विशेष लोकल दादर येथून रात्री २.२५ वाजता सुटणार असून कल्याण स्थानकात ३.३५ मिनिटांनी पोहचणार आहे. तर दादर-कुर्ला विशेष लोकल दादर येथून रात्री ३ वाजता सुटणार असून ३.१५ वाजता कुर्ला स्थानकात पोहचणार आहे. मध्य मार्गावर अप दिशेला कुर्ला-दादर विशेष लोकल रात्री १२ वाजुन ४५ मिनिटांनी, कल्याण-दादर विशेष लोकल रात्री १ वाजता, ठाणे-दादर विशेष लोकल रात्री २ वाजुन १० मिनिटांनी सुटणार आहे.हार्बर मार्गावर डाउन दिशेला कुर्ला-मानखुर्द विशेष लोकल रात्री २ वाजुन ३० मिनिटांनी, कुर्ला-पनवेल विशेष लोकल पहाटे ३ वाजता, कुर्ला-वाशी विशेष लोकल पहाटे ४ वाजता सुटणार आहे.तर अप दिशेला वाशी-कुर्ला विशेष लोकल रात्री १ वाजुन ३० मिनिटांनी,पनवेल- कुर्ला विशेष लोकल रात्री १ वाजुन ४० मिनिटांनी आणि मानखुर्द-कुर्ला विशेष लोकल पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी चालविण्यात येणार आहे. प्रवाशांनी या लोकलचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :मुंबई लोकलमध्ये रेल्वे