Join us  

चर्चगेट ते विरारपर्यंत २७०० सीसीटीव्ही, उपनगरीय स्थानकांवर सुरक्षा वाढीसाठी ११४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 6:34 AM

मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात असून चर्चगेट ते विरारपर्यंतच्या पट्ट्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर एकूण २७०० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात असून चर्चगेट ते विरारपर्यंतच्या पट्ट्यात पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर एकूण २७०० सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी तब्बल ११४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीतील चित्रण स्थानिक पोलीस ठाण्यातही दिसेल, अशी व्यवस्था करण्याचाही निर्णय झाला आहे.पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांच्या पाहणीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालातील काही महत्त्वाच्या बाबी पश्चिम रेल्वेतर्फे बुधवारी जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार, प्रवासी सुविधा आणि सुरक्षा सुधारण्याची गरज असल्याचे दिसून आले आहे. चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान २ हजार ७०० सीसीटीव्ही बसवण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वे स्थानकांत १ हजार ६० सीसीटीव्ही कार्यरत आहे. यापैकी बहुतांशी सीसीटीव्ही बदलण्यात यावे. त्याचबरोबर नव्याने बसविण्यात येणारे सीसीटीव्ही उच्च क्षमतेचे असावेत. या सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहण्यासाठी सर्व संबंधित अधिकाºयांच्या कक्षात जोडणी देण्यात यावी. यात रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, स्थानिक पोलिस ठाणे, स्टेशन मास्टर या कार्यालयांचा समावेश आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिले आहेत.पश्चिम रेल्वेवरील २९ पादचारी पूलांसाठी २४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अहवालात ५ पादचारी पूल उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर १४ पादचारी पूलांची रिप्लेसमेंट करण्यात येणार आहे. १० पादचारी पूल नवीन आहेत. त्याचबरोबर पादचारी पुलांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पुलावर वाय-फाय सेवा देणे बंद करण्याची शिफारस समितीने केली आहे. रेल्वे व्यतिरिक्त ७ पादचारी पूल महापालिका प्रशासन उभारणार आहे. परिणामी पश्चिम रेल्वेवर एकूण ३६ पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत.>सुरक्षेसंबंधी सर्वाधिकार महाव्यवस्थापकांना १८ महिन्यांसाठी देण्यात आले आहेत. यामुळे महाव्यवस्थापकांच्या अखत्यारित असलेल्या शिफारसींच्या अमंलबजावणीस सुरुवात केली आहे. काही पादचारी पुलांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. नोव्हेंबरमधील पहिल्या आठवड्यात निविदा उघडण्यात येतील. उर्वरित कामांचा प्रस्ताव बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. १५ दिवसांच्या आत त्याला मंजुरी मिळत असल्याने कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येणार आहेत.-रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वेउच्चस्तरीय समितीच्या महत्त्वाच्या शिफारसी१५ महिन्यांत महिला डब्यात टॉकबॅक यंत्रणापादचारी पुलांवर दिशादर्शक फलकपादचारी पूल आणि स्थानकांतील मोकळ्या जागांसाठी सुविधा केंद्र व चेक ड्रॉप बॉक्सची जागा बदलण्यात यावी.>एमयूटीपी-३ अंतर्गत सुरक्षा भिंतचर्चगेट ते विरार दरम्यान स्थानकांलगत सुरक्षा भिंत उभारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ठिकठिकाणी एकूण १७.५ किलोमीटर लांबीची सुरक्षा भिंत उभारण्यात यावी. यासाठी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-३ (एमयूटीपी-३) अंतर्गत निधी उपलब्ध करण्याची शिफारस समितीने अहवालात केली आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वे प्रवासी