Join us  

मुंबईतील  १०५ ठिकाणे पावसाळ्यानंतर ‘पूरमुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 4:43 AM

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होत असल्याने सखल भाग पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशा २२५ पैकी १०५ सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन हे परिसर पूरमुक्त होण्यासाठी पावसाळ्यानंतर म्हणजेच आॅक्टोबरपासून कामाला सुरुवात होणार आहे.

मुंबई  - दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होत असल्याने सखल भाग पूरमुक्त करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशा २२५ पैकी १०५ सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा जलद गतीने होऊन हे परिसर पूरमुक्त होण्यासाठी पावसाळ्यानंतर म्हणजेच आॅक्टोबरपासून कामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात मात्र या परिसरातील रहिवाशांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी महापालिका मुख्यालयात शनिवारी बोलाविलेल्या मासिक आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी मुंबईत पावसाळ्यात २२५ ठिकाणी पाणी साचत असल्याचे आढळून आले होते. हे परिसर पूरमुक्त करण्यासाठी या सर्व ठिकाणी पाणी साचण्यामागच्या कारणांचे मूळ शोधून सखोल अभियांत्रिकीय अभ्यास करण्यात आला. त्याआधारे निश्चित करण्यात आलेल्या विविध उपाययोजना आखण्यात आल्या. यापैकी पाण्याचा निचरा होण्यास अधिक वेळ लागणाऱ्या १२० ठिकाणी या उपाययोजना राबविण्यात आल्या.याचे सकारात्मक परिणाम या वर्षीच्या पावसाळ्यात दिसून आल्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र अद्यापही दादर हिंदमाता, सायन रोड क्रमांक २४, मालाड सबवे असे परिसर पाण्यात आहेत. त्यावर तोडगा काढण्यास आणखी वेळ लागणार आहे. त्याचबरोबर १०५ ठिकाणांची कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत.नवीन ठिकाणांचाही शोधदरवर्षी पावसाळ्यात हमखास पाणी तुंबणाºया २२५ ठिकाणांव्यतिरिक्त काही नवीन ठिकाणे या वर्षीच्या पावसाळ्यात आढळून येऊ शकतात.अशा काही नवीन ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास अधिक वेळ लागल्याचे लक्षात आल्यास त्याची नोंद करून आॅक्टोबर २०१८ पासूनच उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.नवा प्रयोगफीतवाला लेन व सेनापती बापट मार्गाच्या जंक्शनजवळील १.६ मीटर ७ १.२ मीटर आकाराच्या जुन्या ‘बॉक्स ड्रेन’चे रूपांतर २.६ मीटर ७ १.२ मीटर आकाराच्या ‘बॉक्स ड्रेन’मध्ये करण्यात आले.एल्फिन्स्टन स्टेशनजवळील ९०० मि.मी. व्यासाच्या पर्जन्यजल वाहिनीचे रूपांतर २.५ मीटर७ १.६ मीटर एवढ्या आकाराच्या ‘बॉक्स ड्रेन’मध्ये करण्यात आले.टेक्सटाईल मिल नाल्यातील पाण्याच्या प्रवाहास अडथळा ठरणाºया ७० झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. 

 

टॅग्स :मुंबईबातम्या