Join us

राज्यात दिवसभरात १०४ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST

मुंबई : राज्यात मंगळवारी ४,१९६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ...

मुंबई : राज्यात मंगळवारी ४,१९६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १०४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ५१ हजार २३८ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात ४,६८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६२,७२,८०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,३९,७६,८८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११.९८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,९१,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २,१२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,६४,८७६ झाली असून, मृतांची संख्या १ लाख ३७ हजार ३१३ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या १०४ मृत्यूमध्ये मुंबई १, ठाणे २, नवी मुंबई मनपा ३, कल्याण-डोंबिवली मनपा ७, वसई-विरार मनपा १, रायगड १, नाशिक ३, अहमदनगर २, जळगाव १, पुणे १५, पुणे मनपा १, पिंपरी-चिंचवड मनपा ५, सोलापूर ११, सातारा ११, कोल्हापूर ३, कोल्हापूर मनपा २, सांगली ६, सांगली मिरज कुपवाड मनपा २ सिंधुदुर्ग २, रत्नागिरी १७, परभणी १, लातूर १, उस्मानाबाद ४ आणि बीड २ इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.