लोकमत न्यूज नेटवर्क
सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात समोर आलेल्या माहितीत आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावर सुमारे दहा ते पंधरा हजार फोन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून १०० सिम कार्ड जप्त करण्यात आली असून, ही सिम कार्ड पश्चिम बंगाल येथून पुरवली जात असल्याची माहिती मिळाली आहे.
ही मंडळी ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून लोकांना ऑक्सिजन बेड मिळवून देण्याकरिता सिप्ला कंपनीच्या नावाने जाहिरात करत होते. त्यामध्ये संपर्क करता मोबाइल नंबर देऊन, दिल्ली, मुंबई, पुणे, जयपूर, हैदराबाद इत्यादी ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचे नमूद करत होते. संपर्क साधून पैसे भरल्यानंतर आरोपी मोबाइल बंद करत होते. आरोपींनी बनावट पॅनकार्ड, आधार कार्डचा वापर करत ३२ बँक खाती उघडल्याचे समोर आले. या ठगांनी आतापर्यंत ६० लाखांची कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे.