Join us  

५८० व्यक्तींपैकी १० टक्के मुंबईकरांचे यकृत चरबीयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 1:41 AM

डॉक्टरांचा अभ्यास अहवाल; आजार वाढण्याचा धोका

मुंबई : गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या तपासणीतून ५८० व्यक्तींपैकी १० टक्के मुंबईकरांचे यकृत चरबीयुक्त असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. यामुळे यकृताचे आजार वाढण्याचा धोका डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. परिणामी याची काळजी मुंबईकरांनी घ्यावी असाही सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.५८० व्यक्तींची आरोग्य चाचणीत रक्त तपासणी, पोटाची व श्रोणीभागाची अल्ट्रासाउंड चाचणीचा समावेश होता. त्यांच्यापैकी ३८२ पुरुष व १९८ महिला होत्या. २७-७४ हा त्यांचा वयोगट होता. प्रत्येकाने प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करून घेणे हितकारक असते. कारण शारीरिक यंत्रणा सुरळीत सुरू आहे याची खातरजमा करून घेणे आवश्यक असते. म्हणून गंभीर आरोग्य समस्यांचे पूवार्नुमान करण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणे हितकारक असते आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्या हाताळण्यास मदत होते, या वर्षभराच्या सर्वेक्षणानंतर डॉक्टरांना धक्कादायक निष्कर्ष मिळाले.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५६ व्यक्तींमध्ये चरबीयुक्त यकृत आढळून आले. त्यांना आपण फिट असल्याचे वाटत होते आणि त्यांच्यापैकी कुणाचीही अशा प्रकारची कौटुंबिक पार्श्वभूमी नव्हती. त्याचप्रमाणे चरबीयुक्त यकृत असलेल्या पुरुष व महिलांचे प्रमाण ३८:१८ होते. याचा अर्थ ३८ पुरुष आणि १८ महिलांचे यकृत चरबीयुक्त असल्याचे आढळले.डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले की, चरबीयुक्त यकृत म्हणजे तुमच्या यकृतात अतिरिक्त प्रमाणात चरबी आहे. त्याला ह्यसायलेंट किलरह्ण असेही म्हटले जाते. दोन प्रकारचे चरबीयुक्त यकृताचे आजार असतात. त्यात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (अल्कोहोलिक स्टिटोपेहटाटिस). सध्याच्या काळात जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे तरुण वयातील व्यक्तींना हा चरबीयुक्त यकृताचा आजार जडत आहे.....तर जीवावर बेतू शकतेआजारांचा धोका वेळची लक्षात नाही आला तर यकृत पूर्णपणे निकामी करू शकते (त्याला यकृताचा सिºहॉसिस म्हणतात.) सिºहॉसिसमध्ये चरबीयुक्त यकृतावर उपचार केलेले नसतात. त्यात यकृताच्या पेशी नष्ट झालेल्या असताता आणि यकृताला चट्टे पडतात आणि हे चट्टे बरे करता येत नाहीत. या रोगाचीा लक्षणे लवकर दिसून येत नाही, त्यामुळे प्राथमिक लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे