Join us  

१० ते १५ हजारांना मिळायचा पेपर, ‘बीएमएस’ पेपरफुटी प्रकरण, आरोपींना एक दिवसाची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 2:02 AM

विद्यापीठाचे पेपर फोडल्या प्रकरणातील मुख्य संशयित कल्पेश बागुल हा एका पेपरमागे साधारण १० ते १५ हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. त्याचप्रमाणे, या रॅकेटमध्ये एक महाविद्यालयीन तरुणीही सहभागी असून, तिच्याकडून पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मुंबई : विद्यापीठाचे पेपर फोडल्या प्रकरणातील मुख्य संशयित कल्पेश बागुल हा एका पेपरमागे साधारण १० ते १५ हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. त्याचप्रमाणे, या रॅकेटमध्ये एक महाविद्यालयीन तरुणीही सहभागी असून, तिच्याकडून पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे तिला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या पेपरफुटीप्रकरणी अंबोली पोलिसांनी शुक्रवारीअटक केलेल्या दहा जणांना एक दिवसाची कोठडी मिळाली आहे.‘बीएमएस’च्या अंतिम वर्षातील पाचव्या सत्रातील ‘इ-कॉमर्स अँड डिजिटल मार्केटिंग’ या विषयाची प्रश्नपत्रिका गुरुवारी फुटली. कांदिवलीच्या निर्मला निकेतन महाविद्यालयात तांत्रिक प्रमुख (टेक्निकल हेड) म्हणून काम करीत असलेला बागुल हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीतून त्याला एका पेपरमागे दहा ते पंधरा हजार रुपये मिळत होते. जीत गांधी (वय २१) ही रक्कम त्याला द्यायचा. तो बेरोजगार असून, पेपरफुटी प्रकरणात तो बागुलला मदत करत होता.त्यांचा तिसरा साथीदार दीप ठाकूर हा शेअर मार्केटमध्ये काम करतो. गांधी आणि बागुल हे दोघेही मालाड पूर्वच्या पुष्पा पार्क, दफ्तरी रोड परिसरात राहतात. त्यांनीच पेपर फोडून विकण्याचा कट रचला. बागुलवर संशय येऊ नये, म्हणून त्याने निर्मला निकेतन कॉलेजमधील विद्यार्थ्यांना कधीच पेपर विकले नाहीत. त्याच्या मोबाइलमध्ये या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नंबर नाही, तसेच कॉलेजमधील अन्य कोणीही त्याला मदत केली नसल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.दरम्यान विद्यापीठाने पेपरफुटीप्रकरणी निवडलेल्या एक सदस्यीय समितीतील सदस्यानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.‘त्या’ दोन लिंकचा शोध?बागुल परीक्षेच्या दीड तास आधी पेपर डाउनलोड करून संबंधितांना ई-मेल करायचा. अटक आरोपींव्यतिरिक्त आणखी काही जणांनाही त्याने ई-मेल पाठविल्याची माहिती तांत्रिक तपासातून मिळाली आहे. त्यानुसार, त्या दोन लिंक शोधण्यात येत आहेत.याशिवाय थेट परीक्षा विभागाच्या सर्व्हरला जोडल्या गेलेल्या ज्या संगणकातून बागुलने प्रश्नपत्रिका बाहेर पाठविल्या, तो जप्त करण्यात येणार असून, यामध्ये आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.पेपर फेसबुक मेसेंजरवर केला पेस्टज्या विद्यार्थिनीच्या मोबाइलवर पेपर सापडला होता, त्या विद्यार्थिनीलादेखील अटक केली जाणार असून, तिने मोबाइलवर आलेली प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलीट करत, फेसबुक मेसेंजरवर पेस्ट केल्याची कबुली विद्यापीठ कमिटीच्या सदस्यांना दिली आहे. तिने पेपर पाठविलेल्या अभिषेक वोरा (२१) या विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे.

टॅग्स :मुंबई