वंदे भारत मिशन द्वारे ७२५ विमानांद्वारे १ लाख ४५ हजार भारतीय मायदेेशी परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 07:10 PM2020-06-27T19:10:00+5:302020-06-27T19:10:25+5:30

विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना हवाई मार्ग आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या वंदे भारत मिशन.

1 lakh 45 thousand Indians returned home by 725 planes through Vande Bharat Mission | वंदे भारत मिशन द्वारे ७२५ विमानांद्वारे १ लाख ४५ हजार भारतीय मायदेेशी परतले

वंदे भारत मिशन द्वारे ७२५ विमानांद्वारे १ लाख ४५ हजार भारतीय मायदेेशी परतले

Next


मुंबई : कोरोनामुळे जगाच्या विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना हवाई मार्ग आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या वंदे भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत 725 विमानांद्वारे 1 लाख 45 हजार भारतीय मायदेशी परतले आहेत. 

6 मे पासून या मिशनद्वारे परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्याच्या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. या कालावधीत 50 हजार पेक्षा अधिक नागरिक भारतातून जगाच्या विविध भागात गेले आहेत. शुक्रवारी विविध देशांतून 3816 भारतीय देशात परतले. 

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासावर बंदी असली तरी देशांतर्गत हवाई प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी देशभरात एकूण 1536 विमानांची देशांतर्गत वाहतूक करण्यात आली त्याद्वारे 63  हजार 722  प्रवाशांनी हवाई प्रवास केला. 
 

Web Title: 1 lakh 45 thousand Indians returned home by 725 planes through Vande Bharat Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.