‘यार, तेरा बेटा तो तुझसे भी दस कदम आगे है...’; ‘तडप’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षयचं ‘अण्णा’साठी ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:51 AM2021-10-29T11:51:24+5:302021-10-29T11:52:24+5:30

Tadap Trailer :अहान शेट्टी (Ahan Shetty) व ताराची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि दमदार अ‍ॅक्शन असलेल्या तडप’च्या ट्रेलरने सर्वांनाचं क्रेझी केलं आहे.

tadap trailer akshay kumar awestruck with suniel shetty son ahan shetty bollywood debut hilarious tweet goes viral | ‘यार, तेरा बेटा तो तुझसे भी दस कदम आगे है...’; ‘तडप’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षयचं ‘अण्णा’साठी ट्वीट

‘यार, तेरा बेटा तो तुझसे भी दस कदम आगे है...’; ‘तडप’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अक्षयचं ‘अण्णा’साठी ट्वीट

googlenewsNext

बॉलिवूडचा ‘अण्णा’ अर्थात सुनील शेट्टीचा (Sunil Shetty) लाडका लेक अहान शेट्टी (Ahan Shetty)लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. होय, अहानचा पहिलावहिला सिनेमा ‘तडप’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर (Tadap Trailer) रिलीज झाला आणि सिनेप्रेमीचं काय तर बॉलिवूडचे सेलिब्रिटीही या ट्रेलरच्या प्रेमात पडले. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) हाही स्वत:ला रोखू शकला नाही. ‘तडप’चा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याने सुनील शेट्टीला टॅग करत एक ट्वीट केलं.
‘यार, सुनील तेरा बेटा तो तुझसे भी दस कदम आगे है. ये किस टाईप की हेराफेरी है भाई? काय ट्रेल आहे. अहानला खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम...,’ असं ट्वीट अक्कीने केलं आहे.

सुनील शेट्टीने अक्कीच्या या ट्वीटला उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, ‘अहानचा फक्त फोटो पाहून शुभेच्छा देणारा तू पहिला होतास आणि तू एक सुंदर गोष्ट म्हटली होतीस. तू दाखवलेल्या प्रेमासाठी आभार...’

तुम्हाला ठाऊक असेलच की, यावर्षी मार्च महिन्यात अक्षयनेच ‘तडप’चा फर्स्ट लुक रिलीज केला होता. ‘अहान, आज तुझ्यासाठी मोठा दिवस आहे. बलवान या तुझ्या वडिलांच्या पहिल्या सिनेमाचं पोस्टर मला आजही आठवतं आणि आज मी तुझ्या पहिल्या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करतोय,’असे अक्षय त्यावेळी म्हणाला होता. मिलन लुथरिया दिग्दर्शित या सिनेमात अहानसोबत तारा सुतारिया लीड भूमिकेत आहे.  
अहान व ताराची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि दमदार अ‍ॅक्शन असलेल्या या ट्रेलरने फॅन्सला क्रेझी केलं आहे. ‘तडप’ हा तेलगू ब्लॉकबस्टर ‘आरएक्स 100’ चा अधिकृत हिंदी रिमेक असून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा रोमँटिक ड्रामा आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  
   

Web Title: tadap trailer akshay kumar awestruck with suniel shetty son ahan shetty bollywood debut hilarious tweet goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.