शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 01:55 PM2021-10-19T13:55:26+5:302021-10-19T13:56:42+5:30

Samantha: बॉलिवूडचा किंग खान लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक एटली (atlee) यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा अॅक्शनपट असून या चित्रपटात समंथा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात होतं.

samantha was the first choice for shah rukh khan atlee film heres why she reportedly turned it down | शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर

शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर

googlenewsNext
ठळक मुद्देसमंथाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha) सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच ती नागा चैतन्यपासून कायदेशीररित्या विभक्त झाली आहे. परंतु, आता या सगळ्या गोष्टी मागे टाकत समंथाने तिचं लक्ष पुन्हा एकदा करिअरकडे देण्यास सुरुवात केली आहे. समंथा सध्या शक्य होईल तितकं स्वत: ला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, यामध्येच तिने अभिनेता शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) काम करण्यास नकार दिल्याचं सांगण्यात येत आहे.

बॉलिवूडचा किंग खान लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक एटली (atlee) यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा अॅक्शनपट असून या चित्रपटात समंथा शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता समंथाने या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. समंथाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.  एटली यांच्या या आगामी चित्रपटाचं अधिकृत नाव अद्यापही जाहीर झालं नसलं तरीदेखील लायन असं या चित्रपटाचं नाव असल्याचं म्हटलं जात आहे.

समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण

या कारणामुळे समंथाने दिला नकार

समंथाला एटली यांच्या आगामी चित्रपटात शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, तिने ही संधी नाकारली. त्यावेळी समंथा आणि नागा चैतन्य फॅमिली प्लॅनिंग करत होते. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी नकार दिला. समंथाने नकार दिल्यानंतर नयनताराला या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आलं. सध्या नयनतारा या चित्रपटात व्यस्त असून ती पुढील सीनचं चित्रीकरण करत आहे.

समंथाने केलंय एटलीसोबत काम

समंथा आणि एटली यांच्यात चांगली मैत्री असून तिने एटलीच्या थेरी आणि मर्सल या चित्रपटामध्ये काम केलं आहे.

समंथा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

'द फॅमिली मॅन २'च्या माध्यमातून ओटीटीवर झळकलेली समंथा लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे.  येत्या काही दिवसांमध्ये ती तिच्या आगामी बॉलिवूड चित्रपटाची घोषणा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Web Title: samantha was the first choice for shah rukh khan atlee film heres why she reportedly turned it down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.