Kiran Mane : ... म्हणून मी केवळ शरद पवारांकडेच गेलो, किरण मानेंनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 06:17 PM2022-01-15T18:17:12+5:302022-01-15T18:24:04+5:30

मी शिक्क्यांना घाबरत नाही, शिक्के मारणारे हे कोण. मी शरद पवार यांच्याकडेच का गेलो तर, शरद पवार हे अभ्यासू, विचारी, विवेकी आणि संयमी व्यक्तीमत्व आहे.

Kiran Mane : ... So I only went to Sharad Pawar, Kiran Mane said about visit of sharad pawar | Kiran Mane : ... म्हणून मी केवळ शरद पवारांकडेच गेलो, किरण मानेंनी सांगितली 'मन की बात'

Kiran Mane : ... म्हणून मी केवळ शरद पवारांकडेच गेलो, किरण मानेंनी सांगितली 'मन की बात'

Next

मुंबई - 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आल्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियातून अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रसेच नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांचे काम बंद केल्यावरुन संताप व्यक्त केला आहे. आता, किरण माने यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, आता शरद पवार मी मांडलेल्या बाजुवर जे निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असेही माने यांनी म्हटलं आहे.

मी शिक्क्यांना घाबरत नाही, शिक्के मारणारे हे कोण. मी शरद पवार यांच्याकडेच का गेलो तर, शरद पवार हे अभ्यासू, विचारी, विवेकी आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. भारतातील कला क्षेत्राचं त्यांना प्रचंड ज्ञान आहे, अभ्यास आहे. त्यांच्यासारखा दुसरा नेता देशात नाही, बाकीचे उथळपणाने प्रतिक्रिया देणारे नेत आहेत. मी त्यांचा प्रचंड आदर करतो, म्हणून ते जर म्हणाले की, एखादी गोष्ट विचार न करता कर, तर मी ती नाही करणार, मी अंधपणे होकार नाही देत. पण, माझी बाजू त्यांच्याकडे मांडावी असे मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, असे किरण माने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

शरद पवारांपुढे मी माझी बाजू मांडली आहे, ते आता काय करायचं ते पाहतील. त्यांनी माझी बाजू घेतली तरी चालेल, नाही घेतली, मला शासन केलं तरी मला आवडेल. कारण, एका अभ्यासू माणसापुढे माझी बाजू मी ठेवलीय, असेही माने यांनी म्हटलं.

दरम्यान, याप्रकरणात चित्रपट दिग्दर्शक, लेखक समीर विद्वांस यांनी उडी घेतली आहे. एखाद्याचं मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे, अशी रोखठोक भूमिका समीर विद्वांस यांनी घेतली आहे. किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरुन त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे", असं समीर विद्वांस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेत कलाकार किरण माने काम करत होते. पण त्यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं. त्यानंतर किरण माने यांनी राजकीय भूमिकेबाबत फेसबुकवर व्यक्त झाल्यानं आपल्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला आहे. किरण मानेंच्या या दाव्यानंतर अनेक नेत्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभी राहिली आहेत. त्यामुळे या वादाला आता राजकीय वळण मिळतं की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 
 

Web Title: Kiran Mane : ... So I only went to Sharad Pawar, Kiran Mane said about visit of sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app