4 दिवसांत 'धाकड'ने आटोपला डाव; चौथ्या दिवशी केवळ ३० लाखांची कमाई करत ठरला सर्वात फ्लॉप चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 04:44 PM2022-05-24T16:44:23+5:302022-05-24T16:45:16+5:30

Dhaakad box office collection: हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसांमध्ये त्याने त्याचा डाव आटोपता घेतला आहे. करोडो रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरीपेक्षाही कमी कमाई केली आहे.

dhaakad box office collection day 4 kangana ranaut biggest flop low collection shocking | 4 दिवसांत 'धाकड'ने आटोपला डाव; चौथ्या दिवशी केवळ ३० लाखांची कमाई करत ठरला सर्वात फ्लॉप चित्रपट

4 दिवसांत 'धाकड'ने आटोपला डाव; चौथ्या दिवशी केवळ ३० लाखांची कमाई करत ठरला सर्वात फ्लॉप चित्रपट

googlenewsNext

Dhaakad Box Office Collection Day 4: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा धाकड हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत केलेली कमाई अतिशय थक्क करणारी आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसांमध्ये त्याने त्याचा डाव आटोपता घेतला आहे. विशेष म्हणजे करोडो रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरीपेक्षाही कमी कमाई केली आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी या चित्रपटाने केवळ काही लाखांची कमाई केल्याचं पाहायला मिळालं.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने अत्यंत किरकोळ कमाई करत कंगनाला निराश केलं. त्यानंतरही त्याची कमाईची गाडी अशीच गडगडत राहिली. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटाने चौथ्या दिवशी केवळ ३० लाखांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.२ कोटींची कमाई करत ओपनिंग केलं होतं. त्यानंतर शनिवारी १.०५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण, रविवारी मात्र, या चित्रपटाची जादू पूर्णपणे ओसरली. या चित्रपटाने केवळ ९८ हजार रुपयांचा बिझनेस केला. तर, सोमवारी फक्त ३० लाख रुपये. त्यामुळे कंगनाचा 'धाकड' बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला आहे. त्याच्या तुलनेत कार्तिक आर्यनचा 'भूल भूलैय्या 2' यशस्वी घोडदौड करत आहे.

दरम्यान, कंगनाचे बॅक टू बॅक चार चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. 'धाकड'पूर्वी 'पंगा', 'जजमेंटल हैं क्या', 'थलायवी' हे चित्रपट अपयशी ठरले. मात्र, आता तिला केवळ आगामी 'तेजस' आणि 'सीता' या दोन चित्रपटांकडूनच अपेक्षा आहे.
 

Web Title: dhaakad box office collection day 4 kangana ranaut biggest flop low collection shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.