'छत्रीवाली' एकट्याने बघायचा विचार करताय? थांबा, दिग्दर्शक काय सांगतात पाहा

By शर्वरी जोशी | Published: January 11, 2022 05:47 PM2022-01-11T17:47:46+5:302022-01-11T17:48:43+5:30

chhatriwali: पोस्टरमध्ये रकुलच्या हातात एक कंडोमचं पाकिट असल्याचं पाहायला मिळत आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा झाली.

bollywood actress rakul preet singh upcoming movie chhatriwali direct tejas deoskar | 'छत्रीवाली' एकट्याने बघायचा विचार करताय? थांबा, दिग्दर्शक काय सांगतात पाहा

'छत्रीवाली' एकट्याने बघायचा विचार करताय? थांबा, दिग्दर्शक काय सांगतात पाहा

googlenewsNext

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रकुल प्रीत सिंह (rakul preet singh). लवकरच रकुलची मुख्य भूमिका असलेला 'छत्रीवाली' (chhatriwali) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टरमध्ये रकुलच्या हातात एक कंडोमचं पाकिट असल्याचं पाहायला मिळत आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर त्याची बरीच चर्चा झाली. यात चित्रपटाचं नाव पाहता त्यात सर्वाधिक बोल्ड सीन, बोल्ड कंटेट असावा असा अनेकांचा समज झाला. परंतु, हा चित्रपट नेमका कसा आहे. त्याची कथा काय आहे याविषयी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देऊस्कर  (tejas deoskar) यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली आहे.  विशेष म्हणजे जर हा चित्रपट तुम्ही एकट्याने पाहण्याचा विचार करत असला तर वेळीच थांबा कारण चित्रपटाच्या कथेत एक ट्विस्ट असल्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे.

"मुळात प्रेक्षकांच्या मनात कोणतीही शंका किंवा किंतु-परंतु राहणार नाही आणि ते कथेशी जोडले जातील याचा विचार करुन या चित्रपटाची मांडणी केली आहे. आणि, १२ वर्षांवरील मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हा चित्रपट पाहू शकतात. १२ वर्षांवरील मुलं यासाठी सांगतोय कारण, त्यांना या गोष्टीची समज असली पाहिजे. या वयात त्यांना या शिक्षणाची गरज असते. विशेष म्हणजे हा चित्रपट संपूर्ण कुटुंब एकत्रपणे बसून पाहू शकेल याच पद्धतीने आम्ही त्याची मांडणी केली आहे", असं तेजस देऊस्कर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "हा चित्रपट पाहताना मुलांना किंवा आई-वडिलांना किळस वाटेल किंवा लाज वाटेल असं काहीही या चित्रपटात नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्रपणे हा चित्रपट एन्जॉय करु शकतात."

दरम्यान, 'छत्रीवाली' या चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटात तिने एका कंडोम टेस्टरची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबतच 'पछाडलेला' या चित्रपटातील बाब्या म्हणजेच अभिनेता अमेय हुनसवाडकर यानेदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. अलिकडेच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून आता प्रेक्षकांचं लक्ष या चित्रपटाच्या रिलीज डेटकडे लागलं आहे.
 

Web Title: bollywood actress rakul preet singh upcoming movie chhatriwali direct tejas deoskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.