ठळक मुद्देपिंजरामध्ये तिने नकारात्मक भूमिका साकारली होती

'अनोळखी', 'तू तिथे मी' या अनेक मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले. पिंजरा मालिकेत भुषण प्रधान, संस्कृती बालगुडे यांच्या मुख्य भूमिका होत्या. तसेच या मालिकेत सारा श्रवण एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.  या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.  'एकापेक्षा एक' या डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये आपल्या डान्सचीही तिने झलक दाखवली होती. 


टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अभिनेत्री सारा श्रवण हिने 3 जूनला दुबईमध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळाचं नाव तिनं आरुष ठेवलं आहे. टाईम्सशी बोलताना सारा म्हणाली, आरुषचा जन्म जुलै महिन्यात व्हायला हवा होता. मात्र आरुष प्री-मॅच्युअर बेबी आहे. मात्र प्री-मॅच्युअर बेबी असला तरी आरुष सुदृढ बालक आहे.


साराचे डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. साराने मालिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिच्या चित्रपटांमधील भूमिका देखील तिच्या चाहत्यांना भावल्या आहेत. पण प्रेक्षकांची लाडकी सारा गेल्या काही महिन्यांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर गेली होती. 


साराने २४ एप्रिल २०१४ मध्ये गणेश सोनावणेसोबत लग्न केले होते.सारा आणि गणेश यांनी तीन वर्षांच्या नात्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या लग्नाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी त्यांच्या चाहत्यांना सांगितली होती.    

 


Web Title: zee marathi's famous serial Tu tithe mi actress blessed with baby boy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.