भाग्यश्री मोटेच्या ट्रॅडिशनल अंदाजातले फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 02:12 PM2019-04-25T14:12:37+5:302019-04-25T14:24:04+5:30

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतं आहे.

You will be able to see the pictures of Bhagyashree Mote's trendsetted shot! | भाग्यश्री मोटेच्या ट्रॅडिशनल अंदाजातले फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ !

भाग्यश्री मोटेच्या ट्रॅडिशनल अंदाजातले फोटो पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ !

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतं आहेभाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतं आहे. त्याला कारणीभूत ठरले आहेत तिचे हे साडीतले खास फोटो.

या फोटोमध्ये भाग्यश्रीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे ज्यामुळे सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. 

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती  'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.

याशिवाय भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष भाग्यश्रीसाठी खास ठरणार आहे.

Web Title: You will be able to see the pictures of Bhagyashree Mote's trendsetted shot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.