तुला काय वाटतं मला एवढी साधी गोष्ट मला माहित नसेल का? सोनाली कुलकर्णी वैतागली 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 03:50 PM2021-11-26T15:50:55+5:302021-11-26T15:51:52+5:30

काही तासांपूर्वी सोनालीनं एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यावर कमेंट्सची बरसात झाली. मात्र याच कमेंट्सपैकी एक कमेंट पाहून Sonalee Kulkarni काहीशी बिथरली.

you think I don’t know that Sonalee Kulkarni reply to user | तुला काय वाटतं मला एवढी साधी गोष्ट मला माहित नसेल का? सोनाली कुलकर्णी वैतागली 

तुला काय वाटतं मला एवढी साधी गोष्ट मला माहित नसेल का? सोनाली कुलकर्णी वैतागली 

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni) सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.  सोनालीनं एखादी पोस्ट शेअर केली रे केली की, लगेचच त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो. काही तासांपूर्वी सोनालीनं एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यावरही लाईक्स आणि कमेंट्सची बरसात झाली. मात्र याच कमेंट्सपैकी एक कमेंट पाहून सोनाली काहीशी बिथरली.
 सोनालीनं तिच्या नव्या हेअरकटचा आणि हेअर कलर करतानाचा सलूनमधील एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत सोनाली तिचा न्यू हेअरकट फ्लॉन्ट करताना दिसतेय. ‘हवा में उडती जाये,’असं कॅप्शन तिनं या व्हिडीओला दिलं आहे. 

तिच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्स पडल्या. यापैकी एक कमेंट मात्र सोनालीला चांगलीच खटकली. ‘केस सुंदर दिसताहेत. पण वारंवार कलर केल्यामुळे केस खराब होतात,’ अशी कमेंट एका युजरने केली. सोनालीनं लगेच या कमेंटवर उत्तर दिलं. ‘तुला काय वाटतं मला एवढी साधी गोष्ट ठाऊक नाही आणि हो, 2 वर्षानंतर मी कलर करतेय,’ असं सोनाली त्यावर म्हणाली.

अप्सरेच्या या उत्तरानंतर संबंधित युजरने सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. पण अप्सरेनं नंतर कुठलीही दाद दिली नाही.
तुम्हाला ठाऊक आहेच की, लग्नानंतर सोनालीनं दमदार कमबॅक केलंय. सोनालीचा ‘झिम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि हाऊसफुल जातोय. याशिवाय ‘पांडू’ हा सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘पांडू’या सिनेमात भाऊ कदम मुख्य भूमिकेत असून कुशल बद्रिकेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तूर्तास सोनाली संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा’ या चित्रपटात बिझी आहे.  2022 च्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: you think I don’t know that Sonalee Kulkarni reply to user

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.