ye re ye re paisa 2 Teaser Out | 'ये रे ये रे पैसा २' चा टीजर आला समोर, तर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार लंडनमधील नयनरम्य स्थळ
'ये रे ये रे पैसा २' चा टीजर आला समोर, तर रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार लंडनमधील नयनरम्य स्थळ

गेल्या वर्षी 2018 च्या सुरूवातीला संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ने रसिकांचे तुफान मनोरंजन केले होते. बॉक्स ऑफीसवरही या सिनेमाने चांगली कमाई केली होती.  रसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर 'ये रे ये रे पैसा २' रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अण्णा परत येतोय अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या "ये रे ये रे पैसा २" या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचं जवळपास ९० टक्के चित्रीकरण लंडनमध्ये झालं आहे. 


 "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. "ये रे ये रे पैसा" या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. गुंतवून ठेवणारं कथानक, दमदार विनोद, उत्तम स्टारकास्टमुळे या चित्रपटाला प्रेक्षकांना डोक्यावर घेतलं. आता लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमेनं या चित्रपटाला "ये रे ये रे पैसा २" च्या रुपात पुढे नेलं आहे.


संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. टीजरमधून या चित्रपटात वेगवान कथानक पहायला मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे. अण्णा परत आल्यानं आता काय धमाल उडणार याचं उत्तर चित्रपटातच मिळेल. येत्या ९ ऑगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Web Title: ye re ye re paisa 2 Teaser Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.