अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, सौंदर्य, अदा आणि स्टाइलचा सुरेख मिलाप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 12:58 PM2020-09-10T12:58:43+5:302020-09-10T13:02:28+5:30

दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात

When you see this photo of actress Mrinmayi Godbole, you too will fall in love, a beautiful combination of beauty, pay and style Mrinmayee Godbole looks breathtakingly beautiful in This Beutiful Photo | अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, सौंदर्य, अदा आणि स्टाइलचा सुरेख मिलाप

अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेचा हा फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, सौंदर्य, अदा आणि स्टाइलचा सुरेख मिलाप

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवत आहेत. मराठी अभिनेत्यांसह मराठमोळ्या अभिनेत्रींनीसुद्धा आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. पूर्वीच्या काळात लूक आणि सौंदर्याबाबत तितकेसे प्रयोग केले जात नव्हते. मात्र आता या अभिनेत्री आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाल्या आहेत.

 

त्यामुळेच त्या आधीपेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागल्या आहेत. सोशल मीडियावर मृण्मयी गोडबोलेचा एक फोटो लक्षनेधी ठरत आहे. इतरांप्रमाणे मृण्मयी देखील सोशल मीडियावर  अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. मृण्मयीने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. 

दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात. नुकताच तिने फोटोशूटमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. एथनिक अंदाजामधील हा फोटो सध्या तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास या तिच्या या फोटोमध्ये  पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तिचा हा  फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

 तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. मृण्मयीचा साडीतील शेअर केलेला फोटोत मृृण्मयीचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.  मृण्मयी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच जास्त सजग असते.. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. मृण्मयीचे नाव देखील आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 

Web Title: When you see this photo of actress Mrinmayi Godbole, you too will fall in love, a beautiful combination of beauty, pay and style Mrinmayee Godbole looks breathtakingly beautiful in This Beutiful Photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.