​जेव्हा तेजश्री प्रधानचा लॅपटॉप चोरीला जातो...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 10:00 AM2018-03-28T10:00:29+5:302018-03-28T15:30:29+5:30

आपल्याजवळची एखादी महागडी वस्तू गहाळ झाली तर सर्वात आधी तुम्ही काय कराल? खास करून कामानिमित्त कुठे बाहेर असताना आपल्या ...

When Tejashree Pradhan's laptop is stolen ... | ​जेव्हा तेजश्री प्रधानचा लॅपटॉप चोरीला जातो...

​जेव्हा तेजश्री प्रधानचा लॅपटॉप चोरीला जातो...

googlenewsNext
ल्याजवळची एखादी महागडी वस्तू गहाळ झाली तर सर्वात आधी तुम्ही काय कराल? खास करून कामानिमित्त कुठे बाहेर असताना आपल्या जवळचा लॅपटॉप कुणी चोरला तर! अगदी असेच काहीतरी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत घडले. झेलू इंटरटेंटमेंटस निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित 'असेही एकदा व्हावे' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान ही घटना घडली.
चित्रीकरणासाठी पुणे येथील डेक्कनमधील एका हॉटेलमध्ये असताना तेजश्रीच्या रूममधून अचानक तिचा लॅपटॉप गहाळ झाला. सर्वसामान्य व्यक्तीची जशी अवस्था होईल अगदी तशीच अवस्था तेजश्रीची झाली होती. लॅपटॉप शोधण्यासाठी तेजश्री आणि 'असेही एकदा व्हावे'च्या टीमने पूर्ण हॉटेल पालथे घातले होते. मात्र कुठेच काही पत्ता लागला नाही. त्यामुळे लॅपटॉप आता चोरीला गेला असून पुन्हा तो मला कधीच मिळणार नाही असे तेजश्रीने गृहीत धरले. मात्र, जसे नायिकेच्या मदतीला नायक धावून येतो अगदी तसाच अभिनेता उमेश कामत तेजश्रीसाठी धावून आला. त्याने चोरीला गेलेला लॅपटॉप चक्क शोधून दिला आणि संपूर्ण टीमला लॅपटॉप चोर कोण हे समजले. हा चोर म्हणजे स्वतः उमेश कामतच होता! याबद्दल बोलताना उमेश सांगतो की, सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तेजश्री अनेकवेळा वस्तू विसरून जात असे. तिच्या या विसरभोळ्या स्वभावामुळे मला आणि सुश्रुतला तिची गंमत करावीशी वाटली. चित्रीकरण आटपून आम्ही सर्व हॉटेलमधून बाहेर पडलो होतो. काहीच वेळानंतर तेजश्रीच्या लक्षात आले की, हॉटेलच्या रूममध्ये ती लॅपटॉप विसरली आहे. तिने याबाबत मला सांगितले. मी लगेचच हॉटेलच्या रिसेप्शनवर फोन करत लॅपटॉपविषयी विचारले. तिथे परत गेल्यावर हॉटेलच्या रिसेप्शनवर तेजश्रीचा लॅपटॉप व्यवस्थितपणे त्यांनी ठेवला होता. त्याचवेळी कार्यकारी निर्माता आशुतोष हिंगेने मला फोन करून तेजश्रीला लॅपटॉप सापडल्याचे सांगू नकोस, आपण तिची गंमत करूयात असे सुचवले. मग मी सुद्धा अगदी तसेच केले,' असा मजेशीर किस्सा उमेशने सांगितला.
तेजश्रीला याबद्दल काहीही कल्पना नसल्यामुळे ती बिचारी अक्षरशः घाबरून गेली होती. लॅपटॉप मिळाला नाही म्हटल्यावर तिचे हातपाय गळाले. एखादी महागडी वस्तू चोरीला गेल्यावर जशी प्रत्येकाची अवस्था होईल अगदी तशीच अवस्था तेजश्रीची झाली होती. सुश्रुत आणि आशुतोषनी तिला रडकुंडीला आणले होते. तिची ही अवस्था पाहता अधिक काळ हे प्रकरण न ताणता येणार नसल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले आणि त्यामुळे उमेश आणि सुश्रुतने लॅपटॉप मिळाला असल्याचे तिला सांगितले आणि तिचा जीव भांड्यात पडला.
उमेश- तेजश्रीची लव्ह केमिस्ट्री मांडणाऱ्या या सिनेमाची मधुकर रहाणे यांनी निर्मिती केली असून त्यांना रविंद्र शिंगणें यांचे सहकार्य लाभले आहे. येत्या ६ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात शर्वाणी पिल्लई, डॉ. निखिल राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड आणि अजित भुरे हे कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Also Read : 'आदर्श सून’ तेजश्री प्रधान बनली आर.जे

Web Title: When Tejashree Pradhan's laptop is stolen ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.