कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा परिणाम म्हणून, भारताच्या माननीय पंतप्रधानांकडून, २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून, हा लॉकडाऊन आपण पाळायलाच हवा. मराठी मनोरंजन विश्वावर सुद्धा याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद आहे. नेहमी व्यस्त असणाऱ्या कलाकारांना स्वतःसाठी थोडा मोकळा वेळ मिळालेला आहे.  डान्सिंग क्वीन' सोनाली कुलकर्णी, हिने हा वेळ सत्कारणी लावायचा निश्चय केलेला आहे. आवडीचे अनेक खाद्यपदार्थ करण्यात वेळ घालवण्याचे तिने ठरवले आहे. 

अर्थात, चमचमीत पदार्थ खात असताना, आरोग्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, याची सुद्धा ती काळजी घेत आहे. जिम बंद असण्याचा कुठलाही परिणाम तिच्या व्यायामावर झालेला नाही.ती  फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. तिचा एक नवीन फोटो समोर आला आहे. मलायका ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या फोटोत याची प्रचिती येईल. फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

 

 सूर्यनमस्कार घालत असतानाचा तिचा विडिओ नुकताच व्हायरल झालेला आहे. आरोग्य उत्तम राहावं यासाठी ती दिवसाला १०८ सूर्यनमस्कार घालत असल्याचं म्हटलं जात आहे. स्वतःच्या फिटनेसची उत्तम काळजी घेत असलेली सोनाली, अनेकांसाठी आदर्श सुद्धा ठरली आहे. तसेच तिने कोरोनाच्या संकटातदेखील मदत करत खारीचा वाटा उचलला आहे. अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सोनालीकडून, तिचे चाहते फिटनेसचे धडे घेत आहेत. या 'फिट अँड फाईन' सोनालीला टीव्हीवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळते, फिट सोनालीच्या दिलखेचक अदा  पाहून चाहतेही फिदा होतात. 


काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला  होता. अवघ्या काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले होते. तुर्तास सोनालीचा हा नवीन वर्कआऊट फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की.

Web Title: This Is What Sonalee Kulkarni Doing During Lock Down-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.